Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

West Bengal Election Political News : पश्चिम बंगालमधील रेजीनगर पोटनिवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली. AJUP प्रमुख हुमायूं कबीर यांनी पोलिसांवर मतदानात हस्तक्षेपाचा आरोप केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.
Humayun Kabir Arrest News
Humayun Kabir Arrest NewsSaam tv
Published On: 
Summary
  • रेजीनगर पोटनिवडणुकीत मतदान सुरू असतानाच राजकीय वातावरण तापले

  • AJUP प्रमुख आणि आमदार हुमायूं कबीर यांना अटक

  • मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यामुळे अटक

  • पोटनिवडणुकांचे निकाल ९ ऑक्टोबरला जाहीर होणार

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदान सुरू असतानाच रेजीनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. आम जनता उन्नयन पार्टीचे (AJUP) प्रमुख आणि आमदार हुमायूं कबीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मतदानादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुमायूं कबीर यांनी रेजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. मतदान प्रक्रियेत काही बूथवर पोलिसांकडूनच गडबड केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांचे काम नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षण करणे आहे, मात्र त्यांच्याकडूनच मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप कबीर यांनी केला.

Humayun Kabir Arrest News
Accident News : भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू, भरधाव डंपरची कारला जोरदार धडक; वाहनांचा चक्काचूर

कबीर यांनी पुढे म्हटले की, मतदानात गडबड करण्याची गरज काय आहे? २३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या आणि त्यावेळी कोणतीही गडबड झाली नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून गडबड सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदानानंतर कबीर यांना त्यांच्या कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कबीर आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे समोर आले. ताब्यात घेतल्यानंतर कबीर यांनी, “माझ्यासोबत काय होत आहे, ते पाहा,” असे म्हणत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना रेजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पुढे अटक करण्यात आली.

Humayun Kabir Arrest News
Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

निवडणुकीपूर्वीही हुमायूं कबीर यांनी पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली होती. प्रचारादरम्यान त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे पक्षाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रचार करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, हुमायूं कबीर यांनी यापूर्वी रेजीनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी रेजीनगरची जागा सोडली. आता या जागेवर त्यांचा मुलगा निवडणूक लढवत आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगरसह देशातील एकूण सहा विधानसभा जागांवर आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकांचे निकाल ९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.दरम्यान आता नागरिकांचे लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com