Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट समुद्रात बुडाली, २१ जणांचा मृत्यू

Senegal Boat Tragedy: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.
Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट समुद्रात बुडाली, २१ जणांचा मृत्यू
Boat AccidentSaam Tv News
Published On: 

पश्चिम आफ्रिकेत मन हेलावून टाकणारी घटना घडली. समुद्रामध्ये प्रवासी बोट बुडून २१ जणांचा मृत्यू झाला. स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट स्पेनच्या कॅनरी बेटांकडे जात असताना ही घटना घडली. बोटीमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. या घटनेमध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला तर एकाचे प्राण वाचवण्यात यश आले. अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

सेनेगलच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी डकारपासून उत्तरेला सुमारे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या केबेमेरजवळ समुद्रात प्रवासी बोट उलटली. शनिवार संध्याकाळपर्यंत २१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांपैकी बहुतेक जण स्थानिक केबेमेर परिसरातील रहिवासी होते. बचाव पथकांना आतापर्यंत फक्त एका व्यक्तीला जिवंत वाचवण्यात यश आले आहे. शोधमोहीम अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पण या बोटीमधून किती जण प्रवास करत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट समुद्रात बुडाली, २१ जणांचा मृत्यू
Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

पश्चिम आफ्रिकेपासून स्पेनच्या कॅनरी बेटांपर्यंतचा हा अटलांटिक मार्ग जगातील सर्वात धोकादायक मार्गांपैकी एक मानला जातो. दरवर्षी हजारो जण आपल्या चांगल्या भविष्याच्या शोधात या जीवघेण्या प्रवासात आपला जीव धोक्यात घालतात. 'वॉकिंग बॉर्डर्स' या स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेनुसार, या वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांतच या मार्गावर किमान ६३५ जणांनी आपला जीव गमावला आहे.

Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट समुद्रात बुडाली, २१ जणांचा मृत्यू
Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.