Seema haider News : पाकिस्तानहून आलेल्या सीमाला सोन्याचं लॉकेट, मुलांना चांदीचा ग्लास; युट्यूबवरून सचिन किती कमावतो? वाचा

Seema haider sachin meena News : सचिनने पाकिस्तानहून आलेल्या सीमाला सोन्याचं लॉकेट, मुलांना चांदीचा ग्लास दिला आहे. दोघेही युट्यूबवरून सचिन चांगली कमाई करू लागले आहेत.
पाकिस्तानहून आलेल्या सीमाला सोन्याचं लॉकेट, मुलांना चांदीचा ग्लास; युट्यूबवरून सचिन किती कमावतो? वाचा
Seema haider News Saam tv
Published On

नवी दिल्ली : सीमा हैदर सध्या युट्यूबवरून जोरदार कमाई करत आहे. सीमाने एका मुलाखतीत या कमाईविषयी माहिती दिली. सीमासोबत सचिन देखील ऑनलाईन मीडियाद्वारे चांगली कमाई करू लागला आहे. या कमाईतून सचिनने सीमाला भगवान रामाच्या नावाचं सोन्याचे लॉकेट दिलं आहे. तसेच मुलांना चांदीचा ग्लास देखील दिला आहे. यानंतर सचिनच्या युट्यूबवरून कमावलेल्या कमाईची चर्चा होऊ लागली आहे.

युट्यूबवरून कमाई सुरु झाल्यानंतर सीमा आणि सचिनचं आयुष्य बदलून गेलं आहे. युट्यूबवरून किती कमाई होते, या प्रश्नावर उत्तर देताना सीमा म्हणाली, ही बाब खासगीच राहिली पाहिजे. त्यांना कळालं तर लोक म्हणतील, हे कसं काय झालं. सीमाने 'युट्यूब'च्या माध्यमातून चांगली कमाई सुरु असल्याचे सांगितले. त्या पैशांमधून मुलांचं शिक्षणही सुरु आहे.

पाकिस्तानहून आलेल्या सीमाला सोन्याचं लॉकेट, मुलांना चांदीचा ग्लास; युट्यूबवरून सचिन किती कमावतो? वाचा
Seema haider : सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या; पहिल्या नवऱ्याची ४ मुलं पाकिस्तानला जाणार? कारण काय?

सीमा हैदरला भारतात येऊन एक वर्ष झालं आहे. सीमाने पुढे म्हटलं की, 'सचिनने मला भगवान रामाच्या नावाचं लॉकेट गिफ्ट दिलं आहे. तसेच मुलांसाठी चांदी आणि पितळाचे ग्लास घेऊन आला आहे. त्याने मुलांना ग्लासमधून दूध पिण्यासाठी आणलं आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सीमाने पुढे सांगितलं की, 'युट्यूब'च्या माध्यमातून कमाई करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आमचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आम्ही जास्त काही केलं नाही. आम्ही दोघांनी कधीच विचार केला नव्हता की, आम्ही युट्यूबवर होऊ. ही सर्व देवाची कृपा आहे. 'युट्यूब'वर व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

पाकिस्तानहून आलेल्या सीमाला सोन्याचं लॉकेट, मुलांना चांदीचा ग्लास; युट्यूबवरून सचिन किती कमावतो? वाचा
Seema Haider YouTube Income: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर व्हिडीओतून किती पैसे कमावते? जाणून घ्या

सीमाने सांगितले की, 'शॉर्ट व्हिडिओच्या एक लाख व्ह्यूजवर एक डॉलरची कमाई होते. याचा अर्थ ८०-८२ रुपये मिळतात. पाच मिनिटांच्या व्हिडिओ एक हजार व्ह्यूज मिळाल्यास २५ रुपये मिळतात. ज्या लोकांची अधिक कमाई होते, त्यांच्या व्हिडिओमध्ये एक तर जाहिरात असते. तर दुसरं ते दुसऱ्यांचं प्रमोशन करतात, असेही सीमाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com