मुलं नव्हे, मुलीच चालवतात खरा वंश; जुना समज विज्ञानानं मोडीत काढला, VIDEO

human lineage : वंशाच्या दिव्याचा अट्टाहास धरणाऱ्या भारतीय समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं एक वैज्ञानिक सत्य समोर आलंय. मुलगा फक्त सामाजिक 'आडनाव' पुढे नेतो, मात्र मानव वंश फक्त मुलगीच पुढे चालवते, असं विज्ञानाने सिद्ध केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Science Challenges
human lineage Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

वंशाचा दिवा मुलगाच असतो. मुलामुळे वंश पुढे चालतो... भारतीय समाजात ही एक पिढ्यानपिढ्या रुजवली गेलेली विचारसरणी... यातूनच कुटुंबाचं नाव आणि वंश पुढे चालवण्यासाठी मुलगाच हवा अशी मानसिकता फोफावत गेली... पण वंशाच्या दिव्यासाठी स्त्रीभ्रूणहत्येसारखं पाप करणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या एक वैज्ञानिक सत्याची जोरदार चर्चा सध्या रंगलीये. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात

1987 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रसिद्ध जनुकशास्त्रज्ञ अॅलन विल्सन, रेबेका कान आणि मार्क स्टोनकिंग यांनी हे संशोधन केले होते. या शास्त्रज्ञांनी जगभरातील वेगवेगळ्या वंश आणि प्रदेशांतील लोकांच्या मायटोकाँड्रियल डीएनए (mtDNA) चा अभ्यास केला होता. जगातील सर्व माणसांचा उगम आफ्रिकेतील एकाच समान महिला पूर्वजापासून झाल्याचे अभ्यासातून समोर आले होते. या काल्पनिक पूर्वज महिलेला संशोधकांनी 'मायटोकाँड्रियल इव्ह' असे नाव दिले होते.या संशोधनानुसार, मानवी शरीरात एक विशेष डीएनए असतो, ज्याला 'मायटोकाँड्रियल डीएनए' म्हणजेच mtDNA म्हटले जाते.

Science Challenges
Snake Rain: उत्तर भारतात सापांचा पाऊस? आकाशातून साप पडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत

हा आपल्या पेशींमधील मायटो काँड्रियामध्ये आढळतो. हा mtDNA जरी एकूण डीएनएमध्ये फक्त 0.1% इतकाच असला, तरी तो तब्बल 2 लाख वर्षे जुना आहे. या डीएनएचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा mtDNA फक्त आईकडूनच मुला-मुलींना मिळतो. वडिलांकडून आलेला हा mtDNA मुलाच्या शरीरात गेल्यानंतर नष्ट होतो. त्यामुळे, मुलाला आईकडून मिळालेला हा डीएनए पुढे वडील बनल्यानंतर तो आपल्या मुलांना देऊ शकत नाही.

Science Challenges
काँग्रेसचे टेन्शन वाढलं, आमदार नितीन राऊत नाराज; थेट दिला पक्ष सोडण्याचा इशारा

21 व्या शतकात जग वेगाने बदलतंय, विज्ञानानंही डोळे दिपवणारी प्रगती केलीये. अशातच आता विज्ञानाने दिलेला हा दाखला डोळे उघडणारा ठरलाय. ज्या समाजात कधीकाळी मुलगाच हवा म्हणून स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना घडल्या, त्याच समाजानं वंशाच्या दिव्याचा खोटा अट्टाहास सोडून, मुलींना सन्मान द्यायला हवा. कारण आता विज्ञानानेही सिद्ध केलंय की वंशाची खरी ओळख आणि साखळी मुलींमुळेच जिवंत आहे. एकूणच, मुलगी ही परक्याचं धन नाही, तर तुमच्या वंशाचं खरं धन आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com