Viral Video: वय विसरा अन् उत्साह पाहा! ‘चुम्मा चुम्मा दे’ गाण्यावर शिक्षिकेचा भन्नाट डान्स; विद्यार्थ्यांचा टाळ्या शिट्ट्यांचा पाऊस, पाहा VIDEO

Chumma Chumma Song Viral Video: डान्स करताना त्यांचा उत्साह सर्वांनाच थक्क करणारा आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे...
Viral Dance Video
Viral Dance VideoSaamtv

School Teacher Viral Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी लग्नात कोणी भर रस्त्यावर तर कधी ट्रेनमध्येही डान्स करतानाचे व्हिडिओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. ज्यामधील अनेक व्हिडिओंनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिक्षिकेच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्या धमाकेदार डान्सने सर्वांनाच चकित केले आहे.

या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून डान्स करणाऱ्या शिक्षिकेचे कौतुक केले आहे. त्यांचा हा जबरदस्त डान्स पाहून तुमचेही पाय आपसीक थिरकायला लागतील.

Viral Dance Video
Crime News: ह्रदयद्रावक! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर; दोन्ही मुलांना दिले विष अन्...

डान्स म्हणजे अनेकांसाठी अगदी आवडीचा विषय. लग्नात, पार्टीमध्ये, वेगवेगळ्या समारंभात अनेकजण डान्स करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या अशाच एका उत्साही शिक्षिकेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्या बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘हम…’ या चित्रपटातील ‘चुम्मा चुम्मा दे दे’ या प्रसिद्ध गाण्यावर स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. ही शिक्षिका आपल्या डान्सने सगळ्यांची मन जिंकताना दिसत आहे. अनेकांना या शिक्षिकेचा डान्स आवडला असून लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

डान्स करताना त्यांचा उत्साह सर्वांनाच थक्क करणारा आहे. त्यांच्या डान्सच्या जबरदस्त स्टेप्स पाहून समोर बसलेले विद्यार्थीही जल्लोश करताना दिसत आहेत. त्यांच्या या डान्सला टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आनंद असा साजरा करावा म्हणते नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओचे जोरदार कौतुक केले आहे...

pritykeshar नावाच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील शिक्षिकाच्या डान्सच्या स्टेप्स पाहून समोर उपस्थित सर्व विद्यार्थी खूप खुश झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील असल्याचे दिसून येतं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com