Crime News
Crime NewsSaam tv

Crime News: ह्रदयद्रावक! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर; दोन्ही मुलांना दिले विष अन्...

Hyderabad News update: सॉफ्टवेअर इंजिनियर कूटूंबातील चौघांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे...
Published on

Hyderabad Crime News: तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबाद (Hyderabad) शहरातील कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर अभियंता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. (Latest Marathi News)

Crime News
Sanjay Raut: या सभेमुळे लोकांची हात भर... मालेगावातील सभेविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणातील (Telangana) हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबातील चार जण एकत्र मृतावस्थेत आढळले. यामध्ये अभियंता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. मुलांच्या प्रकृतीमुळे पती-पत्नीने असे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कुशाईगुडा पोलिसांनी सांगितले की, जी सतीश ( वय,३९), त्यांची पत्नी जी वेद ( वय, ३५) आणि त्यांची मुले, जी निशिकेत (वय, ९) आणि जी निहाल ( वय, ५) हे त्यांच्या कांडीगुडा येथील पार्क रॉयल अपार्टमेंट फ्लॅटमध्ये दुपारी मृतावस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश घरून काम करत होता.

Crime News
Accident News: लातूरात उड्डाणपुलावर अपघात; एका युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की मुलांच्या दीर्घ आजारामुळे त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर या दाम्पत्याने हे कठोर पाऊल उचललं असावं, असा पोलिसांना संशय आहे. फ्लॅटमध्ये शीतपेयाची रिकामी बाटली, अज्ञात पावडर असलेली बाटली आणि रिकामे ग्लास आढळून आले. पोलिसांनी CrPC कलम 174 अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com