Sanjay Raut: या सभेमुळे लोकांची हात भर... मालेगावातील सभेविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली

Sanjay Raut Latest News: मालेगावातील एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे
Sanjay Raut In Malegaon
Sanjay Raut In Malegaonsaam tv

>>निवृत्ती बाबर, नाशिक

Sanjay Raut Video: शिवगर्जना मेळावाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा होणार आहे. एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पुन्हा जीभ घसरली आहे.

सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे प्रथमच मालेगावात येत आहे. त्यामुळे त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभे ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात ही सभा होत असल्याने उद्धव ठाकरे यांची तोफ त्यांच्यासह कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत आणि उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी मालेगावात तळ ठोकून आहेत.

Sanjay Raut In Malegaon
Maharashtra Politics News: मालेगावमध्ये जाहीर सभा! दादा भुसेंच्या होम ग्राऊंडवर ठाकरेंची तोफ धडाडणार; राज ठाकरेंचा घेणार समाचार?

या सभेकडे देशाचे लक्ष - राऊत

या सभेविषयी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष आहे.

रेकॉर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल - राऊत

संजय राऊत म्हणाले, स्वतः मी आणि विनायक राऊतसाहेब या सभेचे काम पाहत आहोत. रेकॉर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल अशी सभा होईल आणि इथे भाड्याने कोणी येणार नाही. दीडशे रुपये भाड्याने देऊन कोणी येणार नाही. असे लोक येतात आणि समोर प्रमुख भाषणं सुरू झाली की निघून जातात. या सबेसाठी काही संस्थानी सुट्या दिल्या आहेत असे देखील राऊत यांनी सांगितले.

'उर्दू ही भाषा देशात नाही का?'

मालेगावात उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेतील पोस्टरवर बोलताना राऊत म्हणाले, देशात उर्दू भाषा नाही का? त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याचे देखील कौतूक केले. भाषेच्या संदर्भात चित्त विचलित करू नका, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर या सभेमुळे लोकांची हात भर.... अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Sanjay Raut In Malegaon
MNS News: मोठी बातमी! राज ठाकरेंचे विश्वासू मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ व्हायरल

सभेपूर्वी मालेगावला छावणीचं स्वरूप

आजच्या सभेच्या पार्श्भूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता मालेगावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 पोलीस उपअधीक्षक, 22 पोलीस निरीक्षक, 55 पोलीस उपनिरीक्षक, 605 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात आहेत.

यशिवाय दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखील दलाच्या ३ तुकड्या देखील तैनात असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावमध्ये ही सभा पार पडणार आहे. (Latest Marathi News)

येथे पाहा व्हिडिओ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com