Avinash Jadhav MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पुर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच पाडवा मेळावा सभा पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी अनधिकृत मशिदी, मजार आणि दर्गांच्या बांधकामावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. सभेच्या दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मुंब्रा येथील डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता.
धमकीचा व्हिडिओ व्हायरल..
अविनाश जाधव यांच्या धमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंढ के मारेंगे” अशी धमकी या व्हायरल व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (Maharashtra Politics)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.