Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स'चे निधन

Sleeping Prince Death: सौदीच्या स्लिपिंग प्रिन्सचे ३५ व्या वर्षी निधन झालं. २० वर्षे कोमात राहिलेल्या प्रिन्सने शनिवारी जगाचा निरोप घेतला. १५ व्या वर्षी प्रिन्सचा लंडनमध्ये भीषण कार अपघात झाला होता तेव्हापासून तो कोमात होता.
Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स' ३५ व्या वर्षी निधन
Sleeping Prince Death:Saam Tv
Published On

जगभरामध्ये स्लीपिंग प्रिन्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या सौदीच्या प्रिन्स वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊदचे निधन झाले. शनिवारी या स्लीपिंग प्रिन्सने ३५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २० वर्षांपूर्वी या प्रिन्सचा लंडनमध्ये भीषण अपघात झाला होता. हा अपघात झाला तेव्हा प्रिन्स १५ वर्षांचा होता. या अपघातानंतर प्रिन्स कोमात गेला होता. २० वर्षे कोमात राहिल्यामुळे या प्रिन्सला स्लीपिंग प्रिन्स असे म्हटले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, १९९० मध्ये प्रिन्स अल वलीदचा जन्म झाला होता. स्लीपिंग प्रिन्स हा सौदी राजघराण्याचे प्रमुख सदस्य आणि अब्जाधीश प्रिन्स अल वलीद बिन तलाल यांचे पुतणे आणि प्रिन्स खालिद बिन तलाल अल सौद यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. २००५ मध्ये अल वलीदचा लंडनमध्ये अपघात झाला होता. तेव्हा तो १५ वर्षांचा होता. तेव्हा तो लंडनमध्ये लष्करी कॅडेट म्हणून शिकण घेत होता. लंडनमध्ये प्रिन्स अल वलीद कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जास्त रक्तस्त्राव झाला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे तो कोमात गेला.

Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स' ३५ व्या वर्षी निधन
Shocking Accident : लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अपघात, प्रसिद्ध गायिकेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, उंचावरुन खाली पडणार इतक्यात...

अपघातानंतर कोमात गेलेल्या प्रिन्सवर त्यांच्या कुटुंबीयांनी चांगले उपचार केले. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. चांगल्या आरोग्य सुविधा असूनही तसंच अमेरिकन आणि स्पॅनिश डॉक्टरांच्या मदतीनंतरही प्रिन्स अल वलीद शुद्धीवर आला नाही. २० वर्षे कोमात राहिल्यानंतर शनिवारी प्रिन्सने जगाचा निरोप घेतला.

२० वर्षे प्रिन्स अल वलीद कोमात होता. प्रिन्सच्या अधूनमधून होणाऱ्या हालचालींमुळे तो बरा होईल असा आशेचा किरण त्याच्या वडिलांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे प्रिन्सच्या वडिलांनी त्याचे व्हेंटिलेटर काढून टाकण्याच्या सूचना जाहीरपणे नाकारल्या होत्या. देवावरील श्रद्धेमुळे ते त्यांच्या मुलावर उपचार करत राहिले. आपला मुलगा एक दिवस बरा होईल याच आशेवर ते प्रिन्स अल वलीदवर उपचार करत राहिले. पण त्यांची ही इ्च्छा पूर्ण झाली नाही. स्लीपिंग प्रिन्सच्या निधनामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स' ३५ व्या वर्षी निधन
Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

प्रिन्सवर उपचार करण्यासाठी आलेल्या जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हार मानली होती पण २० वर्षांत त्याच्या वडिलांचा विश्वास एकदाही तुटला नाही. अल वलीदच्या उपचारादरम्यान अनेक वेळा आशा निर्माण झाली आणि नंतर तुटली. परंतु कोणतेही वैद्यकीय शास्त्र वडिलांच्या हृदयात असलेल्या आशेच्या किरणाला हरवू शकले नाही. प्रिन्सच्या वडिलांनी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत व्हेंटिलेटर काढू दिला नाही. तसंच त्यांनी त्याची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स' ३५ व्या वर्षी निधन
Shocking News : आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर दिला विजेचा शॉक; बायकोने नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

सौदी सरकारने प्रिन्सच्या उपचारासाठी अमेरिका आणि स्पेनमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली पण तो कधीच शुद्धीवर आला नाही. डॉक्टरांनी त्याला वैद्यकीयदृष्ट्या बेशुद्ध घोषित केले होते. पण प्रिन्सच्या वडिलांनी त्याचे उपचार न थांबवण्यास सांगितले होते. यानंत त्याला रियाधमधील राजवाड्यातील एका खोलीत ठेवले होते. याठिकाणी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकिय मदत २४ तास उपलब्ध करून दिली गेली.

प्रिन्स अल वलीदच्या तब्येतीच्या सुधारण्याबाबतचे अनेक व्हिडिओ वेळोवेळी येत होते. यामध्ये त्याच्या हातांच्या किंवा पापण्यांच्या हालचाली दिसू शकत होत्या. यामुळे नेटकऱ्यांनाही आशा होती की तो कदाचित एक दिवस तो शुद्धीवर येईल. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल स्लीपिंग प्रिन्ससारखे हॅशटॅग ट्रेंड करत असतात. त्याच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

Sleeping Prince: १५ व्या वर्षी लंडनमध्ये भीषण कार अपघात, २० वर्षे कोमात; सौदीच्या 'स्लीपिंग प्रिन्स' ३५ व्या वर्षी निधन
Nashik Shocking : आईचा त्रास बघवला नाही...; महिला पोलिसाच्या मुलीनं आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com