Saudi Airlines Plane Fire: २७० प्रवाशी घेऊन जाणाऱ्या सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग; पेशावरमध्ये केलं लँडिंग

Saudi Airlines Plane Fire: पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर उतरत असताना सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला आग लागली. लँडिंग गिअरच्या समस्येमुळे टायरला आग लागली. आग लागली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही
Plane Fire:  २७० प्रवाशी घेऊन जाणाऱ्या सौदी एअरलाइन्सच्या  विमानाला पाकिस्तानात लागली आग
Saudi Airlines Plane Fire

पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर उतरत असताना सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला आग लागल्याची घटना घडलीय. लँडिंग गिअरच्या समस्येमुळे टायरला आग लागल्याची माहिती समोर आले आहे. दरम्यान या घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाइटमध्ये सर्व 276 प्रवासी आणि 21 क्रू मेंबर्स उपस्थित होते.

घटना घडल्यानंतर विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. टायर फुटल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

टायर फुटल्यानंतर आग लागली होती. त्यानंतर सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आलं. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर या घटनेचा तपास सुरू आहे.

अपघाताच्या वेळी विमानात अंदाजे 276 प्रवासी होते. आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. यानंतर प्रवाशांना विमानाच्या इमर्जन्सी गेटमधून बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुदैवाने म्हणावे लागेल.

पेशावरच्या बाचा खान आंतरराष्ट्रीय विमानतळावर थोडे दुर्लक्ष झाले असते तर शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता. सुदैवाने सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले. पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाचे (सीएए) प्रवक्ते सैफुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग गियरमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रक सक्रिय झाले. वैमानिकांना सतर्क करण्यात आले आणि विमानतळाचे अग्निशमन दल आणि बचाव पथक तेथे पाठवण्यात आले.

Plane Fire:  २७० प्रवाशी घेऊन जाणाऱ्या सौदी एअरलाइन्सच्या  विमानाला पाकिस्तानात लागली आग
Pune Airport: दिल्लीहून निघालेलं विमान पुण्याजवळ येताच पुन्हा फिरलं माघारी; प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com