Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक बंद करा!

Omicron Variant फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करण्यात यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केलीय.
Rajesh Tope
Rajesh Tope SaamTvNews
Published On

जालना : कोरोनाचा (Corona) नवा ओमिक्रोन व्हेरिएंट (Omicron Variant) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला असून आपल्या देशात या व्हेरिएंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, हा व्हेरिएंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतुन महाराष्ट्रात (Maharashtra) होणारी विमान वाहतूक रद्द करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात दिलीय.

हे देखील पहा :

विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मोनिटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हेरिएंट राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचे देखील टोपे म्हणाले. विमान प्रवासासाठी 72 तास आधीचे कोरोना टेस्टिंग (Corona Test) प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं असून विमानतळावर कडक तपासणी केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेतुन येणारी विमानं (Flight) बंद करण्यासाठी मुंबई (Mumbai) पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आले असून केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असेही टोपे म्हणाले.

Rajesh Tope
Big News | धुतलेले कपडे नसल्याने गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवले! पहा Video

1 डिसेंबर पासून राज्यातील शाळा (School) सुरु करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबत उद्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यासह तर विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ (Video) कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु होण्याच्या निर्णयावर संभ्रम निर्माण झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com