Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक, अग्निशमन दल घटनास्थळी

Pimpri Chinchwad fire update : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली. यानंतर परिसरातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली.
पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक, अग्निशमनदल घटनास्थळी
Pimpri Chinchwad Fire Saam tv

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज गुरुवारी एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. एका कंपनीला आग लागल्यानंतर शेजारील दोन कंपन्यांनाही आग लागली. या आगीच तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली. एका कंपनीच्या आगीमुळे शेजारी- शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक, अग्निशमनदल घटनास्थळी
Salman Khan Firing Case : सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; पनवेलच्या फार्म हाऊसवर संपवण्याचा होता कट

आज गुरुवार असल्यामुळे कंपन्यामधील कर्मचारी नससल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा अधिक अग्निबंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक, अग्निशमनदल घटनास्थळी
Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

तिन्ही कंपन्यांमध्ये रबरचे मटेरियल बनत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक, अग्निशमनदल घटनास्थळी
Mumbai Alert: अलर्ट! ४५ लाख मुंबईकरांना पावसाळ्यात पुराचा धोका, कारण काय?

मुंबईतील चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट

मुंबईतील चेंबूर कॅम्पमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. चेंबूरमधील एका दुकानात हा स्फोट झाला. दुकान मुख्य रस्त्यावर होतं. त्यामुळे या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com