Isarel Hamas War: गाझामध्ये शाळेवर बॉम्ब हल्ला; ३० निष्पाप लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

Isarel Attack On Hamas School: इस्त्रायल आणि हमासचे युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकतंच इस्त्रायलने हमासमधील एका शाळेवर बॉम्ब हल्ला केला आहे. त्यात ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Isarel Hamas War
Isarel Hamas WarSaam Tv

इस्त्रायल-हमासचे युद्ध अजूनही सुरु आहे. इस्त्रायल हमासच्या युद्धात सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. नुकतंच इस्त्रायलने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमधील सर्वसामान्य लोकांवर हल्ला केला आहे. त्यांनी शाळेवर बॉम्बहल्ला केला आहे. यात जवळपास ३० नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

चिनी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली लष्कराने गाझामधील शाळेवर बॉम्ब हल्ला केला. इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने शाळेच्या तीन वर्गांवर हल्ला केला. यात वर्गाती अनेक लहान मुले मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक पॅलिस्टिनी नागरिक या शाळेत आश्रय घेत होते. त्याच शाळेवर इस्त्रायलने हल्ला केला आहे.

Isarel Hamas War
Nitish Kumar: एनडीएसोबत असलेले नितीश पलटी मारणार? 'पलटूराम' भाजपचं टेन्शन वाढणार?

इस्त्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्यावर हमासने निषेद व्यक्त केला आहे. गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने हा एक भयानक नरसंहार असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायल सैन्याने हे हल्ले चालू ठेवणे म्हणते नरसंहार गुन्हा करणेच आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या या गुन्ह्यांची जबाबदारी इस्त्रायल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इस्त्रायलने काही दिवसांपूर्वीच रफाह शहरावर हल्ला केला होता. त्यात जवळपास ४५ लोकांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. यानंतर अनेक लोकांनी या हल्लाचा निषेद व्यक्त केला होता. सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह 'असा ट्रेंडदेखील सुरु होता.

Isarel Hamas War
National Politics News: जगदीप धनखड यांनी 'आप'ला दिला दणका, राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते स्वीकारण्यास दिला नकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com