मोठी बातमी! मॉस्कोमध्ये संरक्षणमंत्र्यांची हत्या, इमारतीत घुसून हल्लेखोराकडून गोळीबार

Russian Lieutenant General Assassinated in Moscow : मॉस्कोमध्ये एका निवासी इमारतीत एका बंदूकधारीने गोळीबार झाल्याची घटना घडलीय. यात वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी व्लादिमीर अलेक्सेयेव यांचा मृत्यू झालाय.
Russian Lieutenant General Assassinated in Moscow
Security forces at the site in Moscow where senior Russian defence official Vladimir Alexeyev was shot dead.saam tv
Published On
Summary
  • मॉस्कोमध्ये वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

  • निवासी इमारतीत घुसून अज्ञात हल्लेखोराचा गोळीबार

  • व्लादिमीर अलेक्सेयेव हे संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाचे अधिकारी

मॉस्कोमध्ये वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांची गोळ्या घालून हत्या झालीय. हा हल्ला एका निवासी इमारतीत झाल्याची माहिती मिळालीय. शुक्रवारी मॉस्कोमध्ये गोळीबार झाल्यानंतर वरिष्ठ रशियन अधिकारी लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अलेक्सेयेव हे संरक्षण मंत्रालयातील जनरल स्टाफच्या मुख्य संचालनालयाचे उपप्रमुख आहेत.

Russian Lieutenant General Assassinated in Moscow
मशिदीत नमाज पठणावेळी शक्तिशाली बॉम्बस्फोट; ३१ जणांचा मृत्यू, १६९ जखमी

जून २०२३ मध्ये जेव्हा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी बंड केले तेव्हा अलेक्सेयेव हे त्यांच्याशी वाटाघाटी करणाऱ्यापैकी ते एक उच्च अधिकाऱ्यांपैकी एक होते. मॉस्को अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने वायव्य मॉस्कोमधील एका निवासी इमारतीमध्ये घुसून अलेक्सेयेववर गोळ्या झाडल्या.

Russian Lieutenant General Assassinated in Moscow
युद्धकाळात सैनिकांनी केली देशाशी गद्दारी, हमासला विकले आयफोन आणि बॅटरी

दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यापासून अनेक रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या होण्याच्या घटना होत आहेत. या हल्ल्यांसाठी मॉस्को कीवला जबाबदार धरत आहे. काही घटनांची युक्रेनियन लष्करी गुप्तचर यंत्रणेने जबाबदारी स्वीकारली आहे. अलिकडेच मारले गेलेले अधिकारी म्हणजे जनरल स्टाफच्या लष्करी प्रशिक्षण संचालनालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सर्वारोव यांची बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. २२ डिसेंबर रोजी त्यांच्या कारखाली बॉम्बने लावण्यात आला होता.

व्लादिमीर अलेक्सेव्ह कोण आहेत?

व्लादिमीर अलेक्सेव्ह हे २०११ पासून रशियाच्या लष्करी गुप्तचर संस्थेचे, जीआरयूचे पहिले उपप्रमुख म्हणून काम करत होते. त्यांनी GRU ऑपरेशन्समध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अलेक्सेव्हवर यापूर्वी आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले होते. २०१६ मध्ये, अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादले, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान "हानिकारक सायबर कृत्य केलं होतं"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com