Russia Plane Crash: रशियात विमान कोसळलं, प्रिगोझिन यांच्यासह १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती, अपघाताचा VIDEO समोर

Russia Plane Crash News: रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एक खासगी विमान क्रँश होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
Russia Plane Crash Video wagner group chief yevgeny prigozhin feared and 10 people dead
Russia Plane Crash Video wagner group chief yevgeny prigozhin feared and 10 people deadSaam TV
Published On: 

Russia Plane Crash News: रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एक खासगी विमान क्रँश होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मृतांमध्ये वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांचाही समावेश असल्याची प्राथामिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी येवगेनी प्रीगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड केलं होतं. (Latest Marathi News)

Russia Plane Crash Video wagner group chief yevgeny prigozhin feared and 10 people dead
Chandrayaan 3 Update: विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर आलं बाहेर; चंद्रावर पुढील १४ दिवस काय होणार?

एएनआय या वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेलं विमान हे मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गच्या दिशेनं चाललं होतं. हा अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान घडला आहे. अपघातग्रस्त विमान ‘वॅग्नर’ या खासगी लष्करी कंपनीचे संस्थापक प्रिगोझीन यांच्या मालकीचे असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.

रशियातील हवाई वाहतूक नियामक यंत्रणा रोसाव्हितासियाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या यादीमध्ये प्रिगोझीन यांचे नाव आहे. पण प्रिगोझीन या विमानामध्ये बसले होते की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे रशियाकडून त्यांच्या निधनाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान या विमानाचा अपघात झाला तेव्हा विमानामध्ये तीन वैमानिकांसह ७ प्रवासी होते. मॉस्कोपासून उत्तरेला शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या त्वेर भागामध्ये हे विमान कोसळले. रशियन तपास संस्था सध्या या अपघाताची चौकशी करत आहेत. युक्रेनविरोधातील युद्धामध्ये रशियाच्या बाजूने लढणाऱ्या वॅग्नर समूहाच्या प्रीगोझीन यांनी थेट पुतीन यांच्याविरोधात यंदा दंड थोपटले होते.

पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेताच त्यांनी माघार घेतली होती. थेट पुतिन यांनाच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका निर्माण करणारं हे बंड काही मोजक्याच अटींवर थंड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. वॅग्नर ग्रुपमधल्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीची संधी देण्यात येईल, असं पुतिन सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com