

अजित पवार यांच्या विमान अपघाताला २५ दिवस पूर्ण
अपघाताबाबत अद्याप कोणताही अहवाल आला नाही
रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले
त्यांनी VSR कंपनीला राजकीय पाठबळ असल्याचा दावा करत केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला २५ दिवस पूर्ण झाले. या अपघाताचा तपास सुरू आहे पण अद्याप हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर आले नाही. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबईत दोन पत्रकार परिषद घेतल्या होत्या.
आज त्यांनी थेट दिल्लीमध्ये तिसरी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी VSR कंपनीला अनेक राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, 'व्हीएसआर कंपनीबाबत अनेक तक्रारी आहेत. व्हीएसआर कंपनीच्या मागे मोठी लोकं आहेत. या कंपनीला बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असून या कंपनीला वाचवले जात आहे. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घेतला जावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत नायडूंना पदावरून दूर करावे.'
राहुल गांधींनी लक्ष घालून आमचा विषय मांडावा असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी पुढे असे ही सांगितले की, 'विमातळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करूनही ते देण्यास नकार देण्यात आला. डीजीसीए आणि चौकशी समिती काय करत आहेत? सीआयडीने अद्याप एकही अहवाल दिला नाही. १५ तारखेला येणारा अपघाताचा अहवाल अद्याप आला नाही विमानतळ प्रशानस भाजपच्या ट्रोलर्सला का माहिती देत आहे. डीजीसीएचे मोठे अधिकारी व्हीएसआर कंपनीला मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहाच अजित पवारांना न्याय मिळवून देऊ शकतात.
रोहित पवार यांनी यावेळी पायलट नैराश्यत होता आणि तो आर्थिक अडचणीत होता अशी माहिती सांगितले. ते असे देखील म्हणाले की,'विमानात अतिरक्त इंधन ठेवण्यात आले होते. या अतिरिक्त इंधनामुळे स्फोट झाला. ब्लाकबॉक्सबाबत दिशाभूल केली जात आहे. ब्लॅकबॉक्सबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. डीजीसीएचे अनेक मोठे अधिकारी व्हीएसआर कंपनीला मदत करत आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.