लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

Rahul Gandhi Ravneet Singh Bittu Parliament Clash Video: लोकसभेच्या गेटवर राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात जोरदार वाद झाला. ‘गद्दार’ वक्तव्यामुळे संसद परिसरात मोठा गदारोळ निर्माण झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rahul Gandhi and Union Minister Ravneet Singh Bittu engage in a heated verbal exchange during a protest outside the Lok Sabha in New Delhi.
Rahul Gandhi and Union Minister Ravneet Singh Bittu engage in a heated verbal exchange during a protest outside the Lok Sabha in New Delhi.Saam Tv
Published On

देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत दोन दिवसांपासून जोरदार राडा सुरू आहे. ते पुस्तक अद्यापही प्रकाशित झाले नाहीये. त्याआधीच मोठा गदारोळ सुरू आहे. यामुळे अनेकवेळ संसदेतील कामकाज देखील तहकूब केल्या गेले. यावेळी संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात बाचाबाची झाली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे बिट्टू यांना गद्दार म्हणाले तर बिट्टू राहुल गांधींना देशाचा शत्रू म्हणत पलटवार केला. बिट्टू हे मूळचे काँग्रेसचे.

लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी आणि इतर खासदार संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. तेव्हा बिट्टू यांच्याकडे बघत राहुल गांधी म्हणाले की, एक गद्दार चालत येत आहे. त्यांचा चेहरा बघा. यावर एकच हशा पिकला. गद्दार म्हटल्यानंतर राहुल गांधी यांनी बिट्टू यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. हॅलो ब्रदर, मेरे गद्दार दोस्त चिंता मत करो तुम कुछ दिन बाद यहाँ पे वापस आओगे असे म्हणाले. मंत्री बिट्टू यांनी राहुल गांधींशी हस्तांदोलन करण्यास नकार देता. यावेळी दोघांमध्ये काहीकाळ शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.

रवनीत सिंह बिट्टू यांचा राजकीय कारकीर्द राहुल गांधी यांच्यामुळेच सुरू झाला होता. बिट्टू हे तीनवेळा कॉँग्रेसचे खासदार राहिले आहेत. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभव होऊनही भाजपकडून त्यांना मंत्रिपद देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com