विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

ritu jaiswal joins bjp : विरोधी पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ritu jaiswal news
ritu jaiswal joins bjp Saam tv
Published On
Summary

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसलाय

रितु जायसवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय

भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या महिला नेत्या, माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नी रितु जायसवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पटनाच्या भाजप कार्यालयातील आयोजित कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

ritu jaiswal news
BJP Reshuffle: भाजपमध्ये मोठा फेरबदल, थेट ४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

रितु जायसवाल यांच्या पक्षप्रवेशाने बिहारमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे. रितु जायसवाल यांनी प्रवेशानंतर म्हटलं की, 'आतापर्यंत मी एका पक्षासोबत काम करत होते. त्याचवेळी दुसऱ्या पक्षाचं ऐकत होते. विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याची संधी मिळाली. परंतु मला बंडखोर ठरवण्यात आलं'.

रितु जायसवाल यांनी पुढे स्पष्ट केलं आहे की, माझ्यासाठी सर्वात आधी राष्ट्रहित आहे. जो पक्ष राष्ट्राला प्राधान्य दोतो. पंतप्रधान देखील राष्ट्राविषयी भाष्य करतात. आधी कोणाला कर्करोग झाला, तर तो व्यक्ती शेवटचे दिवस मोजायला सुरुवात करायचा. परंतु आयुष्यमान कार्ड आलं आहे. यामुळे शक्ती मिळाली आहे. जर एखाद्या महिलेचा पती आजारी पडला, तर महिलेला माहीत आहे की, आता आयुष्मान कार्डमुळे माझ्या पतीचा जीव वाचू शकतो'.

ritu jaiswal news
पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं: मुख्यमंत्री फडणवीस

रितु जायसवाल यांनी भरभरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. 'मी एका पक्षाच्या विचाराने प्रभावित होते. परंतु जेव्हा लोकांमध्ये पोहोचले. त्यावेळी दोन्ही पक्षाचे मते मिळाली. परंतु लोकांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. लोकांची चिंता दूर करणाऱ्या व्यक्तीचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, असे रितु यांनी म्हटलं.

तत्पूर्वी, बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काही महिन्यापूर्वी भाजपचे सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर जनता दलाचे (JDU) प्रमुख नितीश कुमार राज्यसभेवर पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com