Republic Day 2025: कोण आहे एकता कुमारी? 26 जानेवारीला राजपथवर NCC कॅडेट्सचे करणार नेतृत्व

Who is NCC Cadet Ekta Kumari : राष्ट्रवादी कॅडेट्स कोरच्या कॅडेट एकता कुमारीने जम्मू-काश्मीरचं नाव उंचावले आहे. एकता कुमारी रविवारी नवी दिल्लीच्या प्रजासत्ताकच्या परेडच्या दरम्यान कर्तव्य पथावर एनसीसी मुलींच्या पथकाचं नेतृत्त्व करणार आहे.
Republic Day 2025:
Who is NCC Cadet Ekta Kumari Saam Tv
Published On

राष्ट्रीय कॅडेट कोरची NCC ची कॅडेट एकता कुमारीने जम्मू-काश्मीरची मान उंचावली आहे. रविवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडच्या दरम्यान कर्तव्य पथवर एनसीसीच्या मुलींच्या पथकाचं नेतृत्त्व करणार आहे. एनसीसीच्या मुलींच्या पथकाचं नेतृत्व करणारी ती पहिलीच जम्मू-काश्मीरची कॅडेट असणार आहे. एकता जम्मू जिल्ह्यातील अखनूरची राहणारी आहे.

एकता NCC च्या पहिल्या जम्मू आणि काश्मीर नौदल युनिटची पायनियर कॅडेट आहे. ती गांधी नगर शासकीय महिला महाविद्यालयातून बीएससीचे शिक्षण घेतेय. एकतेच्या नावावर नोंद होणाऱ्या या कामगिरीने जम्मू, काश्मीर आणि लडाखचा गौरव झाला असं संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल म्हणालेत.

Republic Day 2025:
Presidents Medal: ड्रग्स प्रकरण ते पोर्श अपघाताचा तपास; पुण्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबेंचा राष्ट्रपती पदकाने होणार सन्मान, जाणून घ्या तांबेंची कारकीर्द

एकता कुमारीमध्ये देशाची सेवा करण्याची भावना तिच्या वडिलांनी रुजवली होती. एकता कुमारीचे वडील 12 जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीचे सैनिक होते. दरम्यान एकताने आपले प्रारंभिक शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल, अखनूर येथून केले. त्यानंतर सशस्त्र दलात सामील होण्याच्या तिच्या आवडीमुळे तिने कॉलेजच्या दिवसांमध्ये एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. बर्तवाल यांच्या मते, NCC मधील पहिल्या वर्षापासून एकताचा निर्धार आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता दिसून आली.

तिने सामाजिक कार्य आणि साहसी मोहिमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीय. कर्तव्य पथावर अखिल भारतीय बालिका दलाची परेड कमांडर बनणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचं एकता म्हणालीय. ही कामगिरी केवळ माझी नाही तर माझ्या कुटुंबाची, माझ्या युनिटची आणि संपूर्ण जम्मू, काश्मीर आणि लडाख प्रदेशाची असल्याचं ती म्हणालीय. एकताने तिच्या यशाचे श्रेय तिच्या मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांना दिलंय.

Republic Day 2025:
President Murmu Republic Day Eve Speech: न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता आपलं वारशाचे भाग: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तिचे सहयोगी NCC अधिकारी (ANO) आणि प्रशिक्षक होते, त्यांनी तिच्या तयारीदरम्यान तिला मार्गदर्शन केलं. एकता कुमारची ही विलक्षण कामगिरी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांची क्षमता अधोरेखित करते. याशिवाय लोकांना दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाद्वारे त्यांची स्वप्ने साकार करण्यास प्रेरित करते, असं सुरक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनंट कर्नल सुनील बर्तवाल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com