President Murmu Republic Day Eve Speech: न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता आपलं वारशाचे भाग: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Draupadi Murmu Speech On On Republic Day Eve : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित केलं. आपला देश जागतिक समुदायात आपले योग्य स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलाय, असं राष्ट्रपती म्हणाल्या
President Draupadi Murmu
President Draupadi Murmu Speech On On Republic Day EveANI
Published On

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यवीरांची आठवण केली. भारत सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून आपल्या देशाला ज्ञान आणि विवेक मूळ मानले जातं होतं. मात्र भारताला एका अंधारमय काळातून जावं लागलं. आजच्या दिवशी सर्वप्रथम आपण त्या शूरविरांना स्मरण करतो, ज्यांनी मातृभूमीला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी महान बलिदान दिलं, असं राष्ट्रपती म्हणाल्यात.

यावर्षी आपण भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करत आहोत. ते अशा आघाडीच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक आहेत ज्यांच्या भूमिकेला आता राष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात महत्त्व दिले जात आहे. “ आज या प्रसंगी तुम्हाला संबोधित करताना मला खूप आनंद होतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. ७५ वर्षांपूर्वी २६ जानेवारी रोजी भारताची पायाभूत गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली," असं राष्ट्रपती म्हणाल्या.

President Draupadi Murmu
Padma Shri Awards Winners: पद्म पुरस्काराची घोषणा, देशात कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार?

आपण १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले होते. पण वसाहतवादी मानसिकतेचे अनेक अवशेष दीर्घकाळ टिकून राहिले. या सध्याच्या दिवसात आपण ती मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रयत्नांमध्ये, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांच्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

President Draupadi Murmu
Presidents Medal: ड्रग्स प्रकरण ते पोर्श अपघाताचा तपास; पुण्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबेंचा राष्ट्रपती पदकाने होणार सन्मान, जाणून घ्या तांबेंची कारकीर्द

भारताच्या प्रजासत्ताक मूल्यांचे प्रतिबिंब आपल्या संविधान सभेच्या रचनेतही दिसते. विधानसभेत देशाच्या सर्व भागांचे आणि सर्व समुदायांचे प्रतिनिधित्व होते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे संविधान सभेत सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, सुचेता कृपलानी, हंसाबेन मेहता, आणि मालती चौधरी सारख्या १५ महिलांचा समावेश होता. देशाला जागतिक व्यवस्थेत योग्य स्थान मिळाले आहे. बाबासाहेबांनी देशाला भक्कम संविधान दिले आहे.

न्याय हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महात्मा गांधींचा जन्म येथे झाला हे आपल्या देशाचे सौभाग्य आहे. संविधान सभेत सर्व समाजाचे प्रतिनिधित्व होते. नैतिकता हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. न्याय हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महात्मा गांधींचा जन्म येथे झाला हे आपल्या देशाचे सौभाग्य आहे. संविधान सभेत सर्व समाजाचे प्रतिनिधित्व होते. नैतिकता हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com