Presidents Medal: ड्रग्स प्रकरण ते पोर्श अपघाताचा तपास; पुण्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबेंचा राष्ट्रपती पदकाने होणार सन्मान, जाणून घ्या तांबेंची कारकीर्द

Who is Deputy Superintendent Of Police Sunil Tambe: सर्वाधिक काळ पुण्यात कार्यरत असल्यामुळे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबे यांनी पुण्याचे ड्रग्स प्रकरणाचा तपास त्यांनी केला. त्याचप्रमाणे पोर्श कार अपघात प्रकरणाचाही त्यांनी छडा लावला.
Deputy Superintendent Of Police  Sunil Tambe
Who is Deputy Superintendent Of Police Sunil TambeSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांसह इतर सेवा दलांतील राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावं केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलीत. महाराष्ट्रातील एकूण 43 पोलीस या पदकांचे मानकरी ठरलेत. यात पुण्यातील पोलीस उपअधीक्षक सुनील तांबे गुणवत्तापूर्ण सेवा पदकाचे (MSM) महाराष्ट्रातील मानकरी ठरले आहेत. उद्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हा सन्मान सोहळा होणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांसह इतर सेवा दलाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पदकाच्या मानकरींची यादी आज जाहीर करण्यात आलीय. पुण्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर ४२ पोलिसांना या पदकाने सन्मानित केलं जाणार आहे.

Deputy Superintendent Of Police  Sunil Tambe
Pune Police : पुणे पोलीस अॅक्शनमोडमध्ये; ग्रामीण भागात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, कारण काय?

जाणून घ्या सुनिल तांबेंची कारकीर्द

गेल्या ३६ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील तांबे यांची सुरुवात मुंबईत पोलिस उपनिरीक्षक म्हणून झाली. सध्या ते पुण्यात पोलीस उपअधीक्षक (Vigilance officer MS Prison) म्हणून कार्यरत आहेत. मुंबई सह सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरात त्यांनी काम केलं आहे. १९९३ मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी सुनील तांबे यांनी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये काम केलं.

Deputy Superintendent Of Police  Sunil Tambe
Chief Ministers Relief Fund: राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातील चोरी प्रकरणी सुनील तांबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तांबे हे पुण्यात २०१२ मध्ये झालेल्या जर्मन बेकरी स्फोटातील तपास पथकात होते. पुण्यातील २०१४ मध्ये फरासखाना बॉम्ब स्फोट प्रकरणाचा तपास सुनील तांबे यांनी केला. अरुण भेलके, हाफिज हमजा सारख्या नक्षलवाद्यांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुद्धा त्यांनी केलं.

सर्वाधिक काळ पुण्यात कार्यरत असल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीचा खडा न खडा त्यांना ओळखीचा आहे. याचाच फायदा त्यांना पुणे शहरात सापडलेल्या ३६०० कोटी ड्रग्स प्रकरणात झाला. राज्य पोलिस दलातील सर्वाधिक ड्रग्सची जप्ती पुण्यात झाली तेव्हा तांबे गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. ड्रग्स माफिया ललित पाटील आणि त्याच्या रॅकेटचा उलगडा सुद्धा तांबे यांनी केला.

मे २०२४ मध्ये झालेल्या पोर्शे अपघाताचा तपासाची जिम्मेदारी सुद्धा त्यांनी पेलवली. पोलीस दलात काम करत असताना तांबे यांना अनेक वेळा राज्य सरकारतर्फे विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

उल्लेखनीय कामगिरी:

DG Insignia: 2018 मध्ये पोलीस महासंचालक (MS) चिन्ह प्राप्त झाले.

हाय-प्रोफाइल प्रकरणे: १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, जर्मन बेकरी पुणे बॉम्बस्फोट (२०१०), जेएम आरडी बॉम्बस्फोट (२०१२), आणि पुण्यातील फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरण (२०१४) यासह अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांचा यशस्वीपणे तपास केला.

नक्षलवाद्यांना अटक: अरुण भेलके आणि मुथैय्या मुरलीधरन यांच्यासह मोस्ट-वॉन्टेड नक्षलवाद्यांना अटक.

रेकॉर्डब्रेकिंग जप्ती: २०२४ मध्ये ₹ ३६०० कोटी किमतीचे MD ड्रग्ज जप्त केले. हे आतापर्यंत कोणत्याही राज्य पोलिसांनी जप्त केलेले सर्वाधिक अंमली पदार्थ आहे.

मिळालेली बक्षिसे

दिवेआगर गणेश मूर्ती चोरी प्रकरणी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडून १० लाखांचे बक्षीस.

३६०० अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री (गृहमंत्री) फडणवीस यांच्याकडून २५ लाखांचे बक्षीस.

राजस्थानमधील भवरीदेवी हत्याकांडप्रकरणी एक लाख रुपयांचे बक्षीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com