Chief Ministers Relief Fund: राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

Chief Minister's Relief Fund In All Collectorate Offices : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया पेपरलेस होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार आहे.
Chief Minister's Relief Fund
Chief Minister's Relief Fund In All Collectorate Offices Saam Tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरीकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरु करण्यात येणार आहे. याबाबत शासननिर्णय २२ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरीकांना वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

Chief Minister's Relief Fund
Cidco Lottery: सिडकोकडून खुशखबर! घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय? वाचा

याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली देखील विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ राज्यांतील गरजू रुग्णांना घेता यावा यासाठी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

Chief Minister's Relief Fund
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात; पैसे आले की नाही अशा पद्धतीने करा चेक

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून शासनाच्या इतर योजनेस समाविष्ट असलेले आजार वगळण्यात येणार आहेत. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसाहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com