Ramesh Bidhuri Issues Apology : भाजप नेत्याने चूक केली कबूल; प्रियंका गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी, नेमकं काय म्हणाले होते?
मुंबई : भाजपचे माजी खासदार रमेश बिधूरी यांनी खासदार प्रियंका गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. बिधूरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर माजी खासदर रमेश बिधूरी यांनी चूक कबूल करत माफी मागितली आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहित रमेश बिधूरी यांनी माफी मागितली आहे. माझा कोणाला अपमानित करण्याचा हेतू नव्हता, कोणी दुखावलं असेल, तर माफी मागतो, बिधूरी यांनी सांगितलं.
रमेश बिधुरी यांनी भाजपच्या कार्यक्रमात प्रियंका गांधी यांच्यावर भाष्य केलं. 'कालाकाजीमधील रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालासारखे करू, असं वक्तव्य बिधुरी यांनी केलं होतं. बिधुरी यांच्या वक्तव्याने राजकारण तापलं होतं. बिधुरी यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली. रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी तिखट शब्दात भाजवर टीका केली.
'भाजप एक महिला विरोधी पक्ष आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा कारभार भाजप सरकारच्या अधीन आहे. भाजप नेता अधुरी असे वक्तव्य करत असेल तर पक्षातील महिलांना सुरक्षित कसं वाटेल? फक्त कालाकाजी नाही. मला विश्वास आहे की, दिल्लीतील मतदार रमेश बिधुरी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जोरदार प्रत्युत्तर देतील, असे आतिशी म्हणाल्या.
रमेश बिधुरी पोस्ट करत काय म्हणाले?
रमेश बिधुरी म्हणाले, 'माझं वक्तव्यावर काही लोक सोशल मीडियावर राजकीय फायद्यासाठी भाष्य करत आहे. माझा उद्देश कोणाचा अपमान करण्याचा नव्हता. परंतु माझ्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो'. यावेळी बिधुरी यांनी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांही पोस्ट टॅग केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

