राम मंदिर देणगी चोरी प्रकरण! चौकशी आता नव्या SITकडे; CA चा देखील समावेश, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Orders SIT In Ram Temple Donation Theft Case: अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. नव्या एसआयटीची स्थापना करत फॉरेन्सिक ऑडिटचा सल्ला; पारदर्शक तपासावर भर.
RAM TEMPLE DONATION CASE: SUPREME COURT ORDERS NEW SIT, FORENSIC AUDIT LIKELY
RAM TEMPLE DONATION CASE: SUPREME COURT ORDERS NEW SIT, FORENSIC AUDIT LIKELYsaam tv
Published On

अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या देणगी चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती वी मोहना यांच्या खंडपीठासमोर उत्तर प्रदेश सरकारने आपली बाजू मांडली. राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, प्रकरणाची पारदर्शक चौकशी सुनिश्चित करण्यासाठी नव्याने एसआयटी (SIT) गठीत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन करत या नव्या एसआयटीची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लखनऊचे पोलीस महानिरीक्षक (IG) किरण एस यांची एसआयटी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RAM TEMPLE DONATION CASE: SUPREME COURT ORDERS NEW SIT, FORENSIC AUDIT LIKELY
Crime News : पायाचं हाड तुटलं, पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं हृदयाचं; दुसऱ्या दिवशी महिलेने गमावला जीव

या तीन सदस्यीय एसआयटीमध्ये IG किरण एस यांच्यासह अयोध्याचे उपपोलीस महानिरीक्षक (DIG) सोमेन बर्मा आणि अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गौरव ग्रोवर यांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी एसआयटीमध्ये चार्टर्ड अकाउंटंटचा समावेश करण्याचा सल्ला दिला. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सहमती दर्शवली आणि फॉरेन्सिक ऑडिटचा अनुभव असलेल्या ऑडिटरचा समावेश केला जाईल असे आश्वासन दिले. न्यायालयाने एसआयटीला सुरू असलेल्या तपासाबाबत आता पर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करणे हेच सध्या सर्वोच्च प्राधान्य आहे.

RAM TEMPLE DONATION CASE: SUPREME COURT ORDERS NEW SIT, FORENSIC AUDIT LIKELY
Viral Video: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू, हा किळसवाणा VIDEO पाहून तुम्ही सोया चाप खाणं सोडाल

देणगीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मंदिर ट्रस्टला मिळालेल्या सर्व देणग्यांची क्षेत्रनिहाय माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक करण्याची मागणी केली. ही याचिका विरोधासाठी नसून पारदर्शकतेसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सांगितले की, देशभरातून नागरिक ₹100, ₹500, ₹1000 अशा देणग्या देतात, त्यामुळे त्याचा संपूर्ण तपशील ट्रस्टच्या वेबसाइटवर उपलब्ध असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com