Crime : खेडकरने बायकोचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले, एका चुकीनं झाला भंडाफोड, पुण्यात बेड्या

Pune Crime News : बंगळुरूमध्ये एका व्यक्ताने पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकटे सुटकेसमध्ये भरले अन् लपवली. सासू सासऱ्यांना फोन करून मुलीचा जीव घेतल्याचे सांगितले.
Latest Crime News Update
Latest Crime News Updateसोशल मीडिया
Published On

Latest Crime News Update : उत्तर प्रदेशमधील मेरठचं सौरभ-मुस्कान प्रकरणामुळे देशात खळबळ उडालेली आहे, त्यातच बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. मृतदेहाचे तुकडे केले आणि सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर सासू-सासऱ्याला फोन करून हत्याबाबत सांगितले. आरोपीचे नाव 36 वर्षीय राकेश राजेंद्र खेडकर असे आहे. तर मृत महिलेचे नाव ३२ वर्षीय गौरी अनिल खेडकर- सांबेकर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश खेडकर हा महाराष्ट्रातील आहे. तो सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये बंगळुरूमध्ये कार्यरत आहे.

राकेश याने पत्नी गौरीला हिची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अन् घेऊन गेला. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंगळुरूमधील हुलीमावू पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केलीस आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

Latest Crime News Update
Crime News : नवरीने बॉयफ्रेंडसोबत कट रचला, लग्नाच्या १५ दिवसातच नवऱ्याला संपवले

सासू-सासऱ्यांना हत्येचं सत्य सांगितले अन् भंडाफोड झाला

आरोपी राकेश याने बायकोचा जीव घेतला. पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ट्रॉली बॅगमध्ये भरून घेऊन गेला. त्यानंतर सासू-सासऱ्यांना फोन करून तुमच्या मुलीची हत्या केल्याचे सांगितले. सासू-सासऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला. बंगळुरूमधील डोड्डनेकुंडी अपार्टमेंटजवळ गौरीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला. पुण्यातून राकेश याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Latest Crime News Update
Raver Crime News : लिफ्ट देऊन अडकला हनी ट्रॅपमध्ये; ११ लाखांची खंडणी मागणारी महिला ताब्यात, रावेर तालुक्यातील घटनेने खळबळ

राकेशला पुण्यात बेड्या -

राकेश आणि गौरी हे महाराष्ट्रातून नोकरीसाठी वर्षभरापूर्वी बंगळुरूला शिफ्ट झाले होते. गौरीने पत्रकारिताचे शिक्षण घेतले होते, तर राकेश हा एका खासगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचे काम करत होता. राकेश याने गौरीचा निर्दयीपणे जीव घेतल्यानंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या सासू सासऱ्याला सांगितले अन् फरार झाला होता. सासू-सासऱ्यांनी कर्नाटक पोलिसांना संपर्क करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कसून तपास करत राकेश याला पुण्यातून बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com