Husband Murder Auraiya Crime News : मेरठमधील सौरभ हत्याकांडामुळे देशात खळबळ माजली असतानाच आणखी एक असा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील औरेयामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, लग्नाच्या १५ दिवसानंतरच नवरीने नवऱ्याचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याचा जीव घेण्यासाठी नवरीने २ लाख रूपयांची सुपारी दिली होती. तपासानंतर पोलिसांनी नवरी आणि बायफ्रेंडला ताब्यात घेतले आहे.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील सहार येथे घडली आहे. १९ मार्च रोजी पोलिसांना एक तरूण शेतात गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारावेळी तरूणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली अन् आरोपीला पर्दाफाश केला. तरूणाच्या खूनामध्ये नव्या नवरीचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले. तरूणीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
२ लाख रूपयांची सुपारी -
मृत तरूणाचे नाव दिलीप असे आहे, तो हायड्रा चालवण्याचे काम करतो. ५ मार्च रोजी त्याचं प्रगतीसोबत लग्न झाले होते. हे लग्न प्रगतीच्या मनाविरोधात झाले होते. प्रगतीचे गावातीलच बबलू यादव याच्यासोबत अफेअर होत. लग्न झाल्यामुळे प्रगती आणि अनुराग यांच्यात दुरावा आला. त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिलीपचा काटा काढण्याचा प्लान आखळा. प्रगतीने नवऱ्याला मारण्यासाठी दोन लाख रूपयांची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक अभिजीत आर शंकर यांनी सांगितले.
शेतात गोळी मारली अन्...
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पती दिलीपला संपवण्यासाठी प्रगतीने बबलू यादव याच्यासोबत प्लान केला. दोघांनी दिलीपला रस्त्यातून काढण्यासाठी रामजी नागर याला दोन लाख रूपयांची सुपारी दिली. दिलीप याला धोक्याने शेतात बोलवले, तिथे त्याला बेदम मारले अन् रामजीने त्याच्यावर धडाधड गोळ्या धाडल्या. दिलीप मेला असं समजून ते फरार झाले.
CCTV मुळे आरोपीला बेड्या ठोकल्या -
दिलीप याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर सुपारी घेणाऱ्याला आधी बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर प्रगती आणि तिच्या बॉयफ्रेंडचे बिंग फुटले. पोलिसांनी तिन्ही आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.