

Jodhpur Train Accident : राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर येतेय. वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल ८ डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. (Latest Marathi News)
प्राप्त माहितीनुसार, पाली येथील राजकीयावासाजवळ ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रेहून जोधपूरला निघालेली सूर्यनगरी एक्सप्रेस पाली येथील राजकीयावासाजवळ आली असता, एक्सप्रेसचे ८ डबे रेल्वेरूळावरून घसरले. या भीषण दुर्घटनेत जवळपास १० ते १५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
अपघातानंतर चार गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. यानंतर रेल्वे रुळ रिकामा केला जाईल. त्याचवेळी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
अपघाताविषयी माहिती देताना एका प्रवाशाने सांगितलं, की “मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर ५ मिनिटांत ट्रेनच्या आत कंपनाचा आवाज आला. त्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी ट्रेन थांबली. आम्ही खाली उतरून बघितलं असता, स्लीपर क्लासचे ८ डबे आम्हाला रुळावरून खाली घसरलेले दिसले. अपघातानंतर १० ते १५ मिनिटातच रुग्णवाहिका आली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.