मोठा प्रशासकीय फेरबदल; 34 IAS-IPS अधिकाऱ्यांची बदली; कुणाला कुठे मिळाली जबाबदारी?

IAS IPS Transfer List 2026: सरकारने 34 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोणत्या अधिकाऱ्याला कुठे जबाबदारी मिळाली, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Rajasthan Government announces major administrative reshuffle, transferring 34 IAS and IPS officers to key positions
Rajasthan Government announces major administrative reshuffle, transferring 34 IAS and IPS officers to key positionsSaam Tv
Published On

राजस्थान सरकारने पुन्हा एकदा IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. काही दिवसाआधीच राज्यात 64 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती. अशातच गुरुवारी (दि 19) ला 34 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 25 IAS आणि 9 IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Rajasthan Government announces major administrative reshuffle, transferring 34 IAS and IPS officers to key positions
LPG Tanker Shivalik : LPG ची मोठी खेप घेऊन भारताचं 'शिवालिक' जहाज पोहोचलं गुजरातला, देशावरील गॅस संकट टळणार का?

आयएएस अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ स्तरावर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. अखिल अरोरा यांची जयपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अपर्णा अरोरा यांची जयपूर येथील खाण आणि पेट्रोलियम विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रेया गुहा यांची जयपूर येथील हरिश्चंद्र माथूर राजस्थान राज्य सार्वजनिक प्रशासन संस्थेच्या महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण गुप्ता यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदासोबतच युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Rajasthan Government announces major administrative reshuffle, transferring 34 IAS and IPS officers to key positions
Navi Mumbai: खळबळजनक! नवी मुंबईत २ शाळकरी मुलांनी संपवलं जीवन; पोलीस तपासातून समोर आलं चक्रावून टाकणारं कारण

अभिजीत शर्मा यांची अजमेर येथील महसूल मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आलोक गुप्ता यांची जयपूर येथील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल कुमार यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा आणि समन्वय विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान आणि संचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेश कुमार यादव यांची शालेय शिक्षण आणि पंचायती राज (प्राथमिक शिक्षण) विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत कुमार गेरा यांची जयपूर येथील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी आणि भूजल विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajasthan Government announces major administrative reshuffle, transferring 34 IAS and IPS officers to key positions
Accident : देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बाप-मुलगा अन् सुनेसह ५ जणांचा मृत्यू

टी. रविकांत यांची महसूल आणि वसाहत विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भवानी सिंग देथा यांची परिवहन विभागाच्या प्रधान सचिवपदी आणि राजस्थान राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विकास सीताराम भाले यांच्याकडे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com