Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Rajasthan Delhi Mumbai Expressway Accident Update News : राजस्थानमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर मिनी बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू.
rajasthan kota delhi mumbai express highway accident news
rajasthan kota delhi mumbai express highway accident news Saam Tv
Published On: 
Summary
  • राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात

  • प्रवाशांनी भरलेली मिनी बस रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली

  • या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

  • बसमध्ये २५ हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती

राजस्थानमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी खचाखच भरलेली मिनी बस रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये २५ हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कोटा जिल्ह्यातील सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारी मिनी बस अचानक रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. ही बस सुमारे १५ फूट उंचीवरून खाली पडल्याची माहिती आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला.

rajasthan kota delhi mumbai express highway accident news
Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

अपघातग्रस्त बस ज्या नाल्यात पडली, तिकडे पाणी आणि चिखल साचलेला होता. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढताना बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. या क्रेनच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. बस नाल्यात कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

rajasthan kota delhi mumbai express highway accident news
Cancer : भूक कमी झालेय? जठराच्या कॅन्सरचा असू शकतो धोका, दुर्लक्ष करणं पडेल महागात

अपघाताची तीव्रता लक्षात घेता बचावकार्य वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू होते. पाणी आणि चिखलामुळे बसपर्यंत पोहोचणे तसेच प्रवाशांची सुटका करणे आव्हानात्मक ठरत होते. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बस नेमकी कशामुळे नाल्यात कोसळली, याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com