16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

Rajasthan Government Gets 16 New IAS Officers : राजस्थानमधील 16 राज्य प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना IAS पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2025 च्या निवड यादीअंतर्गत नियुक्तीला मंजुरी दिली.
RAJASTHAN IAS PROMOTION
RAJASTHAN IAS PROMOTIONsaam tv
Published On: 

राजस्थानच्या प्रशासकीय वर्तुळात 16 अधिकाऱ्यांना (IAS) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने पत्रक प्रसिद्ध करत 13 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील 2025 च्या निवड यादीअंतर्गत या अधिकाऱ्यांची IAS म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RAJASTHAN IAS PROMOTION
भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कारचा अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

2025 मधील रिक्त पदांच्या आधारे पदोन्नती

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राजस्थान राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा नियमांनुसार करण्यात आली आहे. 2025 या वर्षातील निर्धारित रिक्त पदांच्या आधारे ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना राजस्थान केडर देण्यात आले आहे.

याआधी जयपूर येथे पदोन्नती मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांना आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आले आहे.

RAJASTHAN IAS PROMOTION
२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

राज्य प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना IAS पदावर पदोन्नती मिळणे ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी मानली जाते. या माध्यमातून अनुभवी राज्यसेवा अधिकाऱ्यांन भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते. 1 जानेवारी २०२५ ते 31 डिसेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध झालेल्या रिक्त पदांच्या आधारे ही निवड यादी तयार करण्यात आली आहे.

या 16 अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदावर नियुक्ती

1 गोपाल राम बिरडा

2 मेघना चौधरी

3 ओम प्रकाश जैन

4 राजेश सिंह

5 मुकेश कुमार शर्मा

6 महेंद्र कुमार शर्मा

7 अंजू राजपाल

8 विवेक कुमार

9 मदन लाल नेहरा

10 दिनेश कुमार जांगिड

11 पूनम प्रसाद सागर

12 उमेद सिंह

13 महावीर खराडी

14 डॉ. भागचंद बधाल

15 असलम शेर खान

16 नरेंद्र कुमार बंसल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com