Northern Railways: एका उंदराला पकडण्यासाठी उधळले ४१ हजार रुपये, रेल्वेचा भोंगळ कारभार RTIमधून उघड

Northern Railway: रेल्वेतील उंदीर पकडण्यासाठी उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागानं लाखो रुपये खर्च केले आहेत.
Northern Railways
Northern RailwaysSaam Tv
Published On: 

Northern Railway:

रेल्वेतील उंदीर पकडण्यासाठी उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागानं लाखो रुपये खर्च केले. उंदीर पकडण्यासाठी ३ वर्षात उत्तर रेल्वेनं सुमारे ६९ लाख रुपये खर्च केले आहेत. या हिशोबानं एक उंदीर पकडण्यासाठी उत्तर रेल्वेनं ४१ हजार रुपये खर्च केलेत. उत्तर रेल्वे विभागाचा हा भोंगळ कारभार माहिती अधिकारातून समोर आलाय. (Latest News )

आरटीआयमध्ये करण्यात आलेल्या खुलाशानुसार उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागानं ६९ लाख खर्चून फक्त १६८ उंदीर पकडलेत. उंदरांसाठी रेल्वेनं केलेला खर्च पाहून रेल्वे विभागाला डोक्याला हात लावण्याची वेळ आलीय. चंद्रशेखर गौर नावाच्या व्यक्तीने आरटीआय दाखल करत उंदीर पकडण्यासाठी उत्तर रेल्वेनं किती रुपये खर्च केले जाते हे विचारलं होतं. त्यावर उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागानं उत्तर देत २०२० ते २०२२ दरम्यान किती उंदीर पकडले किती खर्च झाला याची माहिती दिली.

गौर यांनी रेल्वेकडे उंदरांमुळे रेल्वेचे किती नुकसान झाले याचीही माहिती विचारली होती. परंतु रेल्वेनं त्यावर उत्तर दिलंय नाहीये. दरम्यान रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रेल्वेनं २०२० ते २०२२ दरम्यान १६८ उंदीर पकडले आहेत. त्यासाठी ६९.५ लाख रुपये खर्च केले आहेत. रेल्वेनं दिलेल्या उत्तरानुसार, मेसर्स सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, गोमती नगर, लखनौला कराराच्या आधारावर उंदीर पकडण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. करार २०१९ पासून चालू आहे.

दरम्यान अंबाला विभागानं दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारचा उपक्रम असून यात कीटक आणि उंदीर नियंत्रित करण्याच्या उद्देशाने केलेल्या क्रियाकलापांचा समावेश आहे. यामध्ये फ्लशिंग, फवारणी, स्टेबलिंग आणि मेंटेनन्स, झुरळांसारख्या कीटकांपासून रेल्वे मार्गांचे संरक्षण आणि ट्रेनच्या डब्यांमध्ये उंदरांना प्रवेश करण्यापासून रोखणे यांचा समावेश आहे. यासाठी एप्रिल २०२० ते मार्च २०२३ दरम्यान कीटक नियंत्रण, उंदीर नियंत्रण आणि प्युमिगेशन उपचारासाठी ३९.३ लाख रुपये खर्च करण्यात आलेत. उंदराच्या बंदोबस्तासाठी किती खर्च करण्यात आला याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.

दरम्यान लखनौ रेल्वे विभागानं उंदीर पकडण्यासाठी ४१ हजार रुपये खर्च केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वेनं त्यावर स्पष्टीकरण दिलंय. देण्यात आलेली माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचं लखनौ येथी कार्यरत वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक रेखा शर्मा यांनी सांगितलं.

Northern Railways
Samir Choughule: ‘उंदीर मांजर पकडींगो’ गाणं कसं सुचलं?, समीर चौगुलेंन सांगितली पडद्यामागची गोष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.