Rahul Gandhi News : राहुल गांधींचा डबल धमाका; रायबरेली जिंकली अन् वायनाडमध्येही मोठी आघाडी

rahul gandhi latest news : राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. राहुल गांधी रायबरेलीमधून विजयी झाले आहेत. तर वायनाडमध्येही राहुल गांधी आघाडीवर आहेत.
राहुल गांधींचा डबल धमाका; रायबरेली जिंकली अन् वायनाडमध्येही मोठी आघाडी
Rahul Gandhi SAAM TV
Published On

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी डबल धमाका केला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी पराभव केला. तर राहुल गांधी यांनी वायनाडमध्येही मोठी आघाडी घेतली आहे.

राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. राहुल गांधी रायबरेलीमधून विजयी झाले आहेत. तर वायनाडमध्येही राहुल गांधी आघाडीवर आहेत.

रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोटात जल्लोष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मोठ्या फरकाने भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला आहे. राहुल गांधी यांनी ३ लाख ९० हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. राहुल गांधी यांनी मोठा विजय मिळवला आहे.

राहुल गांधींचा डबल धमाका; रायबरेली जिंकली अन् वायनाडमध्येही मोठी आघाडी
Mumbai South Central Result: दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा विजय; राहुल शेवाळेंची हॅट्रिक हुकली

राहुल गांधी तिसरी पिढी म्हणून रायबरेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत उतरले होते. रायबरेलीतील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना विजय जल्लोष साजरा करता आला आहे. रायबरेलीच्या निकालामुळे काँग्रेसला संजीवनी मिळणार आहे.

राहुल गांधींचा डबल धमाका; रायबरेली जिंकली अन् वायनाडमध्येही मोठी आघाडी
Smriti Irani News : लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका, अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव

दरम्यान, वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून ३.५४ लाख मतांनी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com