Mumbai South Central Result: दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा विजय; राहुल शेवाळेंची हॅट्रिक हुकली

Anil Desai Wins : मुंबईमधील दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा ५३,३८४ मतांनी देसाईंनी पराभव केलाय.
Anil Desai Wins
Mumbai South Central ResultSaam TV

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवत झाली आहे. अशात मुंबईमधील दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा ५३,३८४ मतांनी देसाईंनी पराभव केलाय.

Anil Desai Wins
Anil Desai: मविआमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार न करता माघारी फिरले अनिल देसाई

अनिल देसाई यांना या निवडणुकीत ३,९५,१३८ मतं मिळालीत. तर राहुल शेवाळे यांनी ३, ४१,७५४ मतं मिळवलीत. या दोन्ही उमेदवारांमध्ये ५३,३८४ मतांचा फरक आहे.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट) यांच्यात चुरशीची लढत झाली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह राहुल शेवाळेंनी देखील ठाकरे गटाची साथ सोडली होती.

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांत शिवसेनेच वर्चस्व राहिलं आहे. साल २०१४ आणि २०१९ मध्ये राहुल शेवाळे यांनी या मतदारसंघात सलग दोन वेळा बाजी मारली होती. त्यामुळे आता देखील त्यांचाच विजय होईल अशी चर्चा होती. मात्र अनिल देसाईंनी मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात बाजी मारली आहे.

विजयानंतरची प्रतिक्रिया

विजयानंतर अनिल देसाई यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रीया देखील दिली आहे. पडद्यामागे कारायाचं असतं ते काम मी करत होतो. उद्धव ठाकरे यांचे आदेश मी पाळत होतो. पक्षासाठी हे सर्व मी करत होतो. पण टेबलवर बसून काम होत नाही त्यासाठी मैदानात जावं लागतं आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली आणि हे करायचं म्हंटले, आणि मी आदेश घेऊन मैदानात उतरलो. महाविकास आघाडीचे सर्व एकत्र येऊन टीम वर्क झाले आणि हे चित्र समोर आले, असं अनिल देसाईंनी म्हटलं आहे.

Anil Desai Wins
Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेसचे पाडवी आघाडीवर, रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com