Anil Desai: मविआमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार न करता माघारी फिरले अनिल देसाई

South-Central Mumbai Mahavikas Aaghadi Internal Strife: दक्षिण-मध्य मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना, अशी लढाई बघायला मिळत आहे. येथे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना विरोधाला सामोरे जावे लागले आहे.
Anil Desai: मविआमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार न करता माघारी फिरले अनिल देसाई
Mahavikas Aaghadi Anil DesaiANI File

वैदेही काणेकर

मुंबई: महाविकास आघीडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वादामुळे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंना प्रचार न करता माघारी फिरावं लागलंय. दक्षिण-मध्य मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना, अशी लढाई बघायला मिळत आहे. येथे शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई या दोघांमध्ये थेट लढत असणार आहे.

दोन्ही नेते आपला प्रचार करत आहेत. मात्र अनिल देसाई यांना प्रचार करताना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे हा विरोध महाविकास आघाडीतील कार्यकर्तेच करत असल्यानं अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे चेंबूर पांजर पोळ परिसरात प्रचारासाठी गेले होते. परंतु तेथे त्यांना विरोधाराला सामोरे जावे लागले. तेथील स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com