South Central Mumbai Lok Sabha : राहुल शेवाळेंची हॅट्रिक हुकणार? अनिल देसाई ५3 हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर

South Central Mumbai Lok Sabha : मुंबईमधील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत झालीये. त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
South Central Mumbai Lok Sabha
South Central Mumbai Lok SabhaSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. काही वेळात विजयी उमेदवारांची नावे जाहिर होतील. सध्या मतमोजणीचे कल समोर येत आहेत. या कलांनुसार देखील कुणाचा विजय होणार याचा अंदाज बांधला जात आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत झालीये. त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

South Central Mumbai Lok Sabha
Pune Lok Sabha Constituency: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट) हे उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या २५ वर्षांत या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. साल २०१४ आणि २०१९ मध्ये देखील राहुल शेवाळे यांनी या मतदारसंघात बाजी मारली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीच शिवसेनेचे दोन गट झालेत. ससेच सध्या येत असलेल्या कलांनुसार राहुल शेवाळे येथे पिछाडीवर दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी मुंबईमधील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मुसंडी मारल्याचं दिसत आहे. अनिल देसाई ५१,८२१ मतांनी आघाडीवर आहेत. आलेल्या कलांनुसार अनिल देसाईंच्या पारड्यात सध्या ३,८५,७१४ मतं आणि राहुल शेवाळे यांच्यांकडे सध्या ३,३३,८९३ मतं असल्याचं दिसत आहे.

अनिल देसाईंची प्रतिक्रिया

मी उमेदवार म्हणून आणि मतदार म्हणून आणि लोकशाहीची भाग म्हणून मी खुप खुश आहे. लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे आणि आज ते खरं ठरलं आहे. महाराष्ट्रात जे राजकारण आमच्यासोबत झालं आणि आजचं चित्र हे खुप महत्त्वाचे आहे, समोर येत असलेल्या कलांवरून अनिल देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

South Central Mumbai Lok Sabha
Kalyan Lok Sabha Constituency: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com