सीजेपीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरुन दिल्लीतील वातावरण तापलंय. सलग दुसऱ्या दिवशी संसदेत याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. विरोधकांनी संसदेत लाठीचार्जचा मुद्यावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थापर्यंत मार्च काढला आणि त्यांच्या निवसस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीसह काँग्रेसचे सर्व खासदार सहभागी झाले. यावेळी काँग्रेस खासदारांनी स्वत:ला प्रतिकात्मक अटक करून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... त्यामुळे सरकारवर चांगलाच दबाव वाढला. त्यामुळे मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं. यावेळी जितेंद्र सिंह यांना राहुल गांधींनी आपल्य़ा पाच मागण्या सांगितल्या. कोणत्या आहेत या मागण्या ते पाहूयात...
1. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा
2. आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी
3. विद्यार्थ्यांच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा
4. गृहमंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन
5. आंदोलनातील हिंसेची निष्पक्ष चौकशी
दरम्यान विद्यार्थ्य़ांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर संसदेत सत्ताधारी चर्चा करू देत नसल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी केला.. तर धर्मंद्र प्रधानच नव्हे लाठी चार्जचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा आणि ते ज्यांना रिपोर्ट करतात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा, असंही राहुल गांधींनी सांगितलं.
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन कॉक्रोज जनता पार्टीने देशातील विविध ठिकाणी आंदोलन करुन शेवटी दिल्ली गाठली. पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांच्या उपोषणाने आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरलीय़. मात्र दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या हाती नवा मुद्दा आला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं सुरू केलेल्या आंदोलनाचा शेवट काँग्रेस करणार असल्याचं दिसतंय. मात्र सरकारनं ना सीजेपीच्या आंदोलनाला जुमानलं ना वांगचुक यांच्या उपोषणाला..त्यामुळे आता राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानासमोरील मांडलेल्या ठिय्याची तरी सरकार दखल घेणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.