गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सुरक्षा यंत्रणांनी विद्यार्थ्यांवर कारवाई करत पॅलेट गनचा वापर केला...याचं पॅलेट गनमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले...संसदेतही पॅलेट गनचा मुद्दा चांगलाच गाजला..मात्र पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याची FIR नोंदवण्यासाठी पोलीसांनी नकार दिल्यानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आक्रमक झालेत... पीडित साहिलला 200 पेक्षा जास्त बंदूकीचे छर्रे लागले आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला....
दरम्यान पॅलेट गनविरोधात राहुल गांधी कसे आक्रमक झाले...पाहूयात...
दुपारी 12 वाजता
पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची FIR न घेतल्यानं राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा
राहुल गांधी अचानक पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले
दुपारी 12.15 वाजता
राहुल गांधींनी पीडित विद्यार्थी साहिल आणि त्याच्या आईसोबत DCPना त्यांच्या कार्यालयात भेटले.
दुपारी 12.30 वाजता
डीसीपींनी FIR संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यानं
राहुल गांधी डीसीपींच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि पोलीस स्टेशनबाहेर जमिनीवर ठिय्या धरून बसले.
दुपारी 1.30 वाजता
प्रियंका गांधीनीही साहिलला न्याय मिळावा यासाठी आंदोलनस्थळी धाव घेतली
दुपारी 1.40 वाजता
पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिथे रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात करण्यात आली.
दुपारी 2 वाजता
काँग्रेस कार्येकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत साहिला न्याय मिळाल्याशिवाय हटणार नसल्याचा पवित्रा घेतला
संध्याकाळी 6.30
पॅलेट गन प्रकरणात अखेर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला
याप्रकरणात पीडित विद्यार्थ्यानं FIR दाखल करण्यासाठी 14 ऑगस्टपासून कनॉट प्लेस आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अनेकदा खेटा घातल्या... मात्र राहुल गांधींनी थेट पोलीस स्टेशनसमोरच सात तासांचा ठिय्या मांडल्यामुळे अखेर अज्ञाताविरोधात का होईना मात्र गुन्हा दाखल झाला. आता पॅलेट गन चालवणाऱ्यावर आणि त्याला आदेश देणाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा राहुल गांधींना त्यासाठीही आंदोलन करावं लागणार याबाबत आता चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.