Rahul Gandhi : राष्ट्रपतींनीही व्होटचोरी झाल्याचं नाकारलं नाही, उलट पुरावे मागितले; राहुल गांधींनी सांगितला पुढचा प्लान

rahul gandhi president murmu vote chori allegations : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चार दिवसांपासून आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. मतचोरी झाल्याचं राष्ट्रपतींनी नाकारलं नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
आता सरन्यायाधीशांची भेट घेणार: राहुल गांधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांबाबत पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले.saam tv
Published On: 

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामाच नाही तर हे सरकारच बरखास्त करा अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची आज, शुक्रवारी भेट घेतली. मतचोरी झाल्याचं सांगितल्यावर राष्ट्रपतींनी ते नाकारलं नाही, उलट त्यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले, असं राहुल यांनी सांगितले. तसेच येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार असून, सरन्यायाधीशांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देणार असल्याचंही ते म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. आम्ही जेव्हा मतचोरी झाल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी ते नाकारले नाही. त्यांनी आम्हाला पुरावे देण्यास सांगितले. आता आम्ही त्यांच्याकडे पुरावे देणार आहोत. देशात मतचोरी झाली आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. याबाबत आम्ही विचार करू आणि त्यावर आवश्यक कार्यवाही करू असे राष्ट्रपती म्हणाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

आता सरन्यायाधीशांची भेट घेणार: राहुल गांधी
Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मतचोरी होत असल्याचे संपूर्ण देशाला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे सूत्रधार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्याची अंमलबजावणी करतात, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

मतचोरीचा आरोप राष्ट्रपती फेटाळतील आणि भारतात निवडणूक यंत्रणा स्वतंत्र आणि निष्पक्ष असल्याचे त्या म्हणतील, असे वाटले होते. पण तसे झाले नाही. राष्ट्रपतींनी आमचे म्हणणे ऐकून घेतले हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं, असेही राहुल गांधी म्हणाले.

प्रियंका गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनाकडे जात होते, त्यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी विजय चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा, अभिषेक बॅनर्जी, गौरव गोगोई, रंजीत रंजन, रेणुका चौधरी यांच्यासह अनेक नेते होते. ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटवतील आणि लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी त्या कारवाई करतील अशी अपेक्षा असल्याचे या खासदारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com