Sonia Gandhi News: राहुल गांधींचं लग्न लावून द्या; शेतकरी महिला कानात कुजबुजल्यानंतर सोनिया गांधींचं लय भारी उत्तर

शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल गांधी यांचं लग्न लावून देण्याचा सल्ला दिला.
Sonia Gandhi News
Sonia Gandhi NewsSaam tv

sonia Gandhi News: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना अनेकांकडून लग्न करण्याचे सल्ले दिले जात आहेत. राहुल गांधी सध्या ५३ वर्षांचे झाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या लग्नावर साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी हरियाणात एका शेतात भात लावणी करणाऱ्या शेतकरी महिलांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर घरी आलेल्या एका शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल गांधी यांचं लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी शेतकरी महिलेला लय भारी उत्तर दिलं. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी महिलांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या राहुल गांधी यांनी ट्विटरच्या कॅफ्शनमध्ये म्हटलं आहे की, 'आई, प्रियंका आणि माझ्या खूप महत्वाचा क्षण होता. सोनीपतच्या शेतकरी महिलांनी घरी दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांनी खूप गप्पा मारल्या. तसेच त्यांनी गांधी कुटुंबाला भेटवस्तू देखील आणल्या. या महिलांनी घी, गोड लस्सी, लोणचे घेऊन आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितलं.

Sonia Gandhi News
Pakistan Plane Entered India : खळबळ! भारताच्या हद्दीत घुसलं पाकिस्तानचं विमान, तासभर ३ राज्यांत आकाशात घिरट्या

सोनीपतच्या शेतकरी महिलेने सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांचं लग्न लावून द्या, असं कानात सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी या शेतकरी महिलेला 'तुम्ही मुलगी शोधा', असं उत्तर दिलं.

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. २३ जून रोजी बिहार येथील विरोधकांच्या पहिल्या बैठकीत लालू प्रसाद यादव यांनी सल्ला दिला होता. यावेळी राहुल गांधी यांच्यासहित अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

लालू प्रसाद यादव काय म्हणाले होते?

लालू प्रसाद यादव म्हणाले होते, 'राहुल गांधी तुम्ही आतापर्यंत लग्न नाही केलं, तुम्ही लग्न करायला हवं. अजूनही वेळ गेली नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com