Pakistani plane enters Indian airspace: पाकिस्तानचं एक प्रवासी विमान भारतीय हद्दीत घुसलं. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PAI) च्या विमानानं राजधानी इस्लामाबादसाठी उड्डाण भरलं होतं. मात्र, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५.०२ वाजता ते भारतीय हवाई हद्दीत घुसलं. जवळपास सव्वातास हे विमान भारतीय हवाई हद्दीत घिरट्या घालत होतं. (Latest Marathi News)
प्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, हे विमान पाकिस्तानमधून हैदराबादमार्गे भारतीय हवाई हद्दीत राजस्थानमध्ये घुसलं. त्यानंतर हरियाणा आणि पंजाबपर्यंत पोहोचलं. अखेर संध्याकाळी ६.१४ वाजता सीमेजवळील कसूर शहरामार्गे पाकिस्तानमध्ये परतलं.
पीके ३०८ हे विमान स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी ४ वाजता कराचीहून रवाना होणार होते. माहितीनुसार, विमानाने उशिराने उड्डाण भरले. कराची ते इस्लामाबादसाठी एरवी १ तास ४० मिनिटे लागतात. तर भारतीय हद्दीतून गेल्यास आणखी ४२ मिनिटे लागतात.
रिपोर्टनुसार, सोमवारी पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात हवामान अत्यंत खराब होते. इस्लामाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पाकिस्तानी प्रवासी विमानाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्याची माहिती नागरी उड्डाण अधिकाऱ्यांना होती, असे सांगण्यात येत आहे. जूनमध्ये भारताचे विमानही अमृतसरहून अहमदाबादकडे जात असताना, जवळपास अर्धा तास पाकिस्तानी हवाई हद्दीत गेले होते.
पाकिस्तानमधून खराब हवामानामुळे भरकटलेले विमान राजस्थानच्या सीमाभागात पोहोचले. तेथून ते हरियाणा आणि पंजाबच्या हद्दीत अवकाशात घिरट्या घालत होते. जवळपास सव्वा तास हे विमान भारतीय हवाई हद्दीत फिरताना दिसले. पंजाबमध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी ते विमान पुन्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत परतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.