

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाला माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आणले. या विद्यार्थ्यावर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. त्यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला, असा दावा त्यांनी केला. त्याचा डोळा वाचेल की नाही हे अद्याप डॉक्टरांनी स्पष्ट केलेले नाही. यावेळी राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर हल्लाबोल केला. प्रधान हे क्रिमिनल शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यामुळे आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असंही ते म्हणाले.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
जखमी विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी.
ज्याच्यामुळे पेपर लीक झाले. ज्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले, त्या धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्यात यावे अशी आमची पहिली मागणी आहे. तसेच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची दुसरी मागणी आहे. पंतप्रधान मोदींनी जखमी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी आमची तिसरी मागणी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे आणि त्यांना धमकावणे बंद करावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारने उर्वरित मागण्या मान्य करण्यावर सहमती दर्शवल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, याबाबतही त्यांनी प्रश्न विचारला. त्यावर आम्ही आमची बाजू स्पष्टपणे समोर ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या सांगितलेल्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करत आहोत. धर्मेंद्र प्रधान हे आपली शिक्षण व्यवस्था कोडमडल्याचे प्रतीक आहेत. त्यांना आता जावंच लागेल. या मुलांना धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे मारहाण झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांमुळे देशात पेपर लीक झाले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.