परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

raghav chadha News : राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अप्रत्यक्ष वक्तव्य माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी केलं आहे. आतिशी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
raghav chadha news update
raghav chadha News Saam tv
Published On
Summary

राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं

अशोक मित्तल यांची त्यांच्या जागी नियुक्ती

राघव चढ्ढा यांच्यावर माजी मुख्यमंत्री आतिशी यांचे भाष्य

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आलं आहे. राघव यांच्या जागी पंजाबमधून अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राघव चढ्ढा यांना पदावरून हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राघव चढ्ढा आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

raghav chadha news update
Shivsena vs BJP : भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण सुरूय; शिंदे गटापुढे आमचं काही चालत नाही, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते आतिशी यांनी राघव चढ्ढा यांच्यावर भाष्य केलं आहे. आतिशी यांनी म्हटलं आहे की, 'भाजपची एक एसओपी आहे. ते आधी नेत्यांना घाबरवतात. त्यानंतर धमकी देतात. काही वेळानंतर आमिष देतात. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी घाबरून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता राघव देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे'.

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी म्हटलं की, 'देश एका संकटाचा सामना करत आहे. लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीत मतदारांची नावे कमी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान करण्यात आले. प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. भाजपने दिल्लीत मतचोरी केली आहे. आता पश्चिम बंगालमध्येही मतचोरी केली जात आहे'.

raghav chadha news update
Political News : देशात मोदी -शाहांचा 'पर्सनल लॉ'; विधानसभा अध्यक्षांच्या हाती भाजपचे तुणतुणे; 'सामना'तून टीकास्त्र

'टीएमसी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव आणते, त्यावेळी चढ्ढा सही करण्यास नकार देतात. लोकशाहीवरील हल्ल्याच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षातील नेते सभात्याग करतात. त्यावेळी चढ्ढा सभात्याग करण्यास नकार देतात. एलपीजी संकटावेळी सर्वसामान्य रांगेत उभे राहतात, तर काही जण काळ्या बाजारातून सिलिंडर खरेदी करतात. या प्रश्नावर पक्षाने आवाज उचलण्यास सांगितलं. त्यावेळी ते आवाज उचलण्यास नकार देतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, राघव चढ्ढा हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरले आहेत. त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com