Iran Israel war : विमानतळावर स्फोट, परिस्थिती हाताबाहेर! इराण-इस्रायल युद्धात अडकली स्टार खेळाडू आणि अभिनेत्री; मोदींना विनंती

Iran Israel war impact : इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाली असून दुबई विमानतळावर पीव्ही सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान अडकल्या आहेत. विमानतळावर स्फोटाची घटना घडल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
PV Sindhu
PV SindhuSaam
Published On

Iran Israel conflict latest updates : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर शक्तीशाली हवाई हल्ला केलाय. या हल्ल्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या युद्धाच्या परिस्थितीमुळे जगभरात परिणाम होत आहे. अनेक विमाने रद्द झालेली आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसून आला. दिल्ली, मुंबई, पुण्यातून आखाती देशातील विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम भारतीयांवरही झाला आहे. ऑलिंपिक पदक विजेती भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान दुबाईच्या विमानतळावर अडकल्या आहेत. पीव्ही सिंधूने दुबईतील परिस्थितीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तर सोनल चौहान हिने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.

इराणने युएईपासून सौदी अरेबिया, बहरीन, कतार आणि कुवेतपर्यंतच्या देशांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हवाई हल्ल्यांमुळे या देशांच्या हवाई सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. भारतीय स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि सोनल चव्हाण या दुबई विमानतळावर अडकल्या आहेत. ऑल इंग्लंड स्पर्धेत भाग घेण्यासाठी पी.व्ही. सिंधू बर्मिंगहॅमला जात होती. ती दुबई विमानतळावर अडकली आहे. सिंधूने शनिवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

PV Sindhu
नरसंहार! इस्त्राईलचा इराणच्या शाळेवर हल्ला, 100 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Iran Israel conflict latest updates
Iran Israel conflict latest updates

पीव्ही सिंधूने तेथील परिस्थितीची माहिती देणारी पोस्ट केली आहे. प्रत्येक तासानंतर परिस्तिती अधिकच भयावह होत आहे. काही तासांपूर्वी, विमानतळावर आम्ही जिथे लपलो होतो तिथे स्फोट झाला. माझा प्रशिक्षक उभा होत्या त्याच्या जवळच हल्ल्याचे केंद्र होते.हा आपल्या सर्वांसाठी खूप तणावपूर्ण आणि भयावह क्षण आहे, असे सिंधूने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.

PV Sindhu
अमेरिका, इस्त्रायलचा इराणच्या १० मोठ्या शहरावर हल्ला, २०० जणांचा मृत्यू, ७५० जखमी; परिस्थिती हाताबाहेर!

आम्ही आता सर्वजण आता सुरक्षित आहोत. दुबई विमानतळ कर्मचारी आणि दुबई अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आम्हाला सुरक्षित ठेवले आणि सतत मदत केल्याबद्दल दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाचे विशेष आभार. सध्या तरी, परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहोत, असे सिंधूने म्हटलेय. दरम्यान, दरम्यान, भारतीय पुरुष बास्केटबॉल संघ दोहा येथे अडकला आहे. हा संघ २०२७ च्या FIBA ​​विश्वचषक आशियाई पात्रता फेरीसाठी प्रवास करत होता. सध्या हा संघ कतारमधील दोहा येथे अडकला आहे.

PV Sindhu
अमेरिका, इस्त्रायलचा इराणच्या १० मोठ्या शहरावर हल्ला, २०० जणांचा मृत्यू, ७५० जखमी; परिस्थिती हाताबाहेर!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com