मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले, नशेत बोलू लागले अन्...; विरोधी पक्षाच्या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ

Punjab CM : कामगार दिनी पंजाब विधानसभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन अधिवेशनात आल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले, नशेत बोलू लागले अन्...; विरोधी पक्षाच्या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ
Published On
Summary

पंजाब विधानसभेत मोठा राजकीय वाद

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप

शिरोमणी अकाली दलाकडून व्हिडिओ जारी

राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत पोहोचले आणि भाषण देऊ लागल्याचा आरोप विरोधी पक्ष शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे विधानसभेत दारू पिऊन आल्याचा गंभीर आरोप शिरोमणी दलाने केला आहे. दरम्यान पंजाबमधील विरोधी पक्ष, शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दारू प्यायलेला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले, नशेत बोलू लागले अन्...; विरोधी पक्षाच्या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ
Shaktipeeth Highway: एका विशिष्ट 'देवा'ला शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांची फडणवीसांवर बोचरी टीका

अकाली दलाने ट्विटर पोस्ट करताना लिहिले की,"ही शरमेची बाब आहे की भगवंत मान आज कामगार दिनानिमित्त दारू पिऊन विधानसभेच्या पवित्र सभागृहात पोहोचले." तुम्ही स्वत: मुख्यमंत्र्याची स्थिती पाहून घ्या.विधानसभेत कशाप्रकारे ते वागतात. मुख्यमंत्र्यांच्या अशा वागण्याचा आम्ही निषेध करतो. आजच्या दिवशीतरी शराब पिऊन विधानसभेत जायला पाहिजे नव्हतं. मुख्यमंत्र्यांची डोप टेस्ट केली जावी, जेणेकरून खरी बाब समोर येईल.

मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले, नशेत बोलू लागले अन्...; विरोधी पक्षाच्या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

पंजाबचे विरोधीपक्ष नेते प्रताप सिंह बाजवा यांनी सर्व आमदाराची अल्कोहोल चाचणी केली पाहिजे. काँग्रेसच्या एका आमदाराने आरोप केला की, पंजाबचे मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले. त्यामुळे सर्व आमदारांची अल्कोहोल मीटर चाचणी झाली पाहिजे. "राष्ट्रप्रमुखांवर" गंभीर आरोप झाल्यामुळे सत्यता पडताळण्यासाठी प्रत्येक आमदाराची चाचणी झालीच पाहिजे.

पंजाब विधानसभेतील गदारोळावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, हे विशेष अधिवेशन 'कामगार दिना'ला समर्पित आहे. त्यांनी सर्व सदस्यांना वाद टाळून सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन केलं. कामगार दिनानिमित्त राज्यातील 'आप' सरकारने १ मे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. सरकार "आपल्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात आणि कमकुवत अवस्थेत" असताना या विशेष अधिवेशनाचा कामगारांना कसा फायदा होईल, असा प्रश्न काँग्रेस नेते वॉरिंग यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com