Navjot Singh Sidhu News: नवज्योत सिंग सिद्धू उद्या तुरुंगातून बाहेर येणार; काय होतं प्रकरण?

नवजोत सिंग सिद्धू हे उद्या अर्थात १ एप्रिल २०२३ रोजी तुरुंगातून बाहेर येणार आहे.
Navjot singh sidhu
Navjot singh sidhuSaam TV
Published On

Navjot Singh Sidhu News : रोड रेज प्रकरणात शिक्षा भोगणारे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू हे उद्या अर्थात १ एप्रिल २०२३ रोजी तुरुंगातून बाहेर येणार आहे. नवजोत सिंग सिद्धू हे उद्या पाटियाळा तुरुंगातून बाहेर येणार आहे. नवजोत सिंग सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

रोड रेज प्रकरणी नवजोत सिंग सिद्धू यांची १८ मे २०२३ पर्यंत तुरुंगात राहावं लागणार होतं. तुरुंगाच्या नियमानुसार त्यांची सुटका १८ मे २०२३ पर्यंत बाहेर येणार होते. तुरुंगाच्या नियमानुसार, कैद्यांना प्रत्येक महिन्याला ४ दिवसांची सुटी दिली जाते. आतापर्यंतच्या शिक्षेत सिद्धू यांनी एकदाही पॅरोलवर बाहेर आले नव्हते.

Navjot singh sidhu
Kejriwal Fines For PM Modi Degree: PM मोदींची डीग्री मागणं केजरीवालांना भोवलं, गुजरात हायकोर्टानं २५ हजार दंड ठोठावला; तो आदेशही रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांची तस्करी करणारे आणि त्यासंबंधित कैद्यांना सोडून अन्य कैद्यांना चांगल्या वर्तुवणुकीच्या आधारावर एक महिन्यांपासून ते चार-पाच दिवसांची सूट दिली जाते. या व्यतिरिक्त सरकारी सुट्टीचा लाभ देखील मिळतो. शिक्षा भोगत असताना सिद्धू यांनी एक देखील सुटी घेतली नव्हती. त्यामुळे सिद्धू यांची शिक्षा पूर्ण होण्याचा ४८ दिवसाआधीच तुरुंगातून बाहेर येणार आहे.

नवजोत सिंग सिद्धू भोगत असलेले रोड रेज प्रकरण आहे तरी काय?

दरम्यान, नवजोत सिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने १९ मे रोजी एक वर्षांची शिक्षा दिली होती. नवजोत सिंग सिद्धू यांचे नवजोत सिंग सिद्धू यांचं हे प्रकरण १९८८ सालातील आहे. एकंदरित हे प्रकरण ३३ वर्ष जुनं आहे. सिदधू यांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी २० मे रोजी आत्मसमर्पण केलं होतं. गेल्या १० महिन्यांपासून सिद्धू तुरुंगात होते.

Navjot singh sidhu
Sarpanch Agitation Thrown Money: विहीर मंजुरीसाठी BDOने लाच मागितली, शेतकरी पुत्राची सटकली; त्यानंतर जे घडलं ज्याने अख्खं प्रशासन हादरलं

सिद्धू यांनी त्यांच्या मित्रासोबत एका ६५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली होती. कार पार्किंगवरून हा वाद झाला होता. सिद्धू यांच्या धक्काबुकीत ६५ वर्षीय गुरनाम सिंग खाली पडले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

तर गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणानंतर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर यांच्या निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com