Sarpanch Agitation Thrown Money: विहीर मंजुरीसाठी BDOने लाच मागितली, शेतकरी पुत्राची सटकली; त्यानंतर जे घडलं ज्याने अख्खं प्रशासन हादरलं

Phulambri Panchayat Samiti: गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप एका सरपंचाने केला आहे.
Sambhjinagar News
Sambhjinagar News Saam TV
Published On

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News : सरकारी काम आणि सहा महिने थांब... अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. मात्र टेबलाखालून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याचा खिसा गरम केला की सूत्र पटापट हालतात. अनेकांचा असा काहीसा अनुभव असेल. मात्र सगळेच सरकारी कर्चचारी असे असतात असं नाही. मात्र सरकारी कामात होत असलेला भ्रष्टाचार नाकारता येऊ शकत नाही. (Breaking Marathi News)

शेतकऱ्यांना याचा भ्रष्टाचाराचा मोठा फटका बसतो. कारण अनेक सरकारी योजना आणि इतर कामांसाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यलयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडून कामं लवकर होण्यासाठी लाचेचही मागणी केली जाते. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. पण संतापलेल्या संरपंचाने केलेलं कृत्य पाहून परत कुणा अधिकार, कर्मचाऱ्यांची लाच मागण्याची हिंमत होणार नाही.

Sambhjinagar News
IAS Officer Grandparents News: नातू IAS अधिकारी, मुलाकडे 30 कोटींची संपत्ती तरी वृद्ध दाम्पत्याने अन्नावाचून संपवलं जीवन; काळीज पिळवटून टाकणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप एका सरपंचाने केला आहे. त्यानंतर या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठलं.

मंगेश साबळे असे या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत. यावेळी या सरपंचाने राज्य शासनावर टीका केली. पैशांची अक्षरश: उधळण मंगेश साबळे यांनी पंचायती समिती कार्यालयाबाहेर केली.

Sambhjinagar News
Thane News : 'काकांच्या पाठीत खंजीर खूपसला, राेहित पवारांना पाडा निराेप देणा-या अजित पवारांनी गद्दारीविषयी बाेलू नये' (पाहा व्हिडिओ)

सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले, मात्र साधी विहीर बांधण्यासाठी अधिकारी पैसे मागत आहेत. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, असं म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर साबळे यांनी नोटांची उधळण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com