IAS Officer Grandparents News: नातू IAS अधिकारी, मुलाकडे 30 कोटींची संपत्ती तरी वृद्ध दाम्पत्याने अन्नावाचून संपवलं जीवन; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Haryana News : जगदीशचंद्र आर्य आणि भागाली देवी यांचा नातू ट्रेनी IAS अधिकारी आहे.
Haryana News
Haryana NewsSaam Tv

Haryana News : वृद्ध आई वडिलांनी मुलाच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्यांची हृदय पिळवटून टाकणारी घटना हरयाणातून समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम्पत्याला घरातून जेवण दिलं जात नसे. कधी शिळं अन्न किंवा सुखी भाकर दिली जात असे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की त्यांच्या मुलाची परिस्थिती हालाखिची असेल. पण तसंही नाही. या दाम्पत्याने मृत्यू आधी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाकडे 30 कोटींची संपत्ती आहे. (Breaking Marathi News)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा नातू सध्या ट्रेनी IAS अधिकारी आहे. हरियाणातील चक्री दादरी येथील घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगदीशचंद्र आर्य आणि भागाली देवी यांनी विष प्राशन करुन जीवन संपवलं आहे. मुलगा वीरेंद्र आर्य यांच्यासोबत ते राहत होते. (Latest Marathi News)

Haryana News
Delhi News : मच्छर अगरबत्ती लावून झोपी गेलं अख्खं कुटुंब, सकाळी ६ जण मृतावस्थेत आढळले; दिल्लीतील घटनेने हळहळ

आत्महत्येपूर्वी दाम्पत्याने लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं की, माझ्या मुलाची 30 कोटींची मालमत्ता आहे. पण तरीरी तो आम्हाला एक भाकरी सुद्धा देत नाही. जगदीश चंद्र यांनी दोन वर्षे अनाथाश्रमात घालवली. दरम्यान त्यांच्या पत्नीला लकवा मारला. त्यानंतर ते मुलाकडे राहायला आले होते. पण त्याने आमचा छळ करण्यास सुरुवात केली. तो आम्हाला शिळी भाकरी देत असे.

जगदीश चंद्र यांनी पुढे लिहिलं की, शिळी भाकरी आणि सुकी भाकरी खाण्यापेक्षा विष खाल्लेलं बरं आहे. म्हणूनच आम्ही सल्फास गोळी खात आहोत. या प्रकरणी हरयाणा पोलिसांनी कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Haryana News
Narsesh Mhaske Statement : पवार कुटुंब समजायला... गद्दारीच्या टीकेवर काका पुतण्यांसह सुळेंचे उत्तर (पाहा व्हिडिओ)

नातू ट्रेनी IAS अधिकारी

जगदीशचंद्र आर्य आणि भागाली देवी यांचा नातू ट्रेनी IAS अधिकारी आहे. विवेक आर्यने 2021 मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com