वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुम्ही PNB चे ग्राहक असाल आणि तुम्ही गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरं तर, पंजाब नॅशनल बँकेनंतर (punjab national bank) आता पीएनबी हाउसिंग फायनान्स ने देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यावेळी PNB हाऊसिंगने गृहकर्जासह अनेक किरकोळ कर्जावरील व्याजदरात ३५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.३५ टक्के वाढ केली आहे. नवे दर आजपासून म्हणजेच ९ मेपासून लागू करण्यात आले आहेत.
हे देखील पाहा-
पीएनबी हाउसिंग अंतर्गत, ग्राहकांना घर बांधणे आणि घर खरेदी दोन्हीसाठी कर्ज मिळते असते. यामध्ये रिटेल आणि कॉर्पोरेट या दोघांचाही वाटा आहे. मात्र आता यासाठी ग्राहकांना (customers) जास्त ईएमआय (EMI) द्यावा लागणार आहे. याशिवाय नवीन कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. यापूर्वी पीएनबी बँकेनेही आपले व्याजदर वाढवले होते.
बँकेने माहिती दिली
पीएनबी हाउसिंगने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार नवीन व्याजदर वेगवेगळ्या तारखांपासून लागू होणार आहेत. नवीन ग्राहकांसाठी RLLR ७ मे २०२२ पासून लागू होईल. त्याच वेळी, ग्राहकांसाठी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) १ जून २०२२ पासून ६.९० टक्के असणार आहे.
यापूर्वी पीएनबीनेही व्याजदर वाढवले आहेत. याअंतर्गत व्याजदर ०.४० टक्क्यांनी वाढवून ६.९० टक्के करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की PNB ने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की १ जून २०२२ पासून ग्राहकांसाठी RLLR ६.५० टक्क्यांवरून ६.९० टक्क्यांवर पोहोचला आहे.
RBI ने रेपो दरात वाढ
४ मे रोजी आरबीआयने रेपो दर ४ टक्क्यांवरून ४.४० टक्के करण्याची घोषणा केली होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक बाजारात वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधनांच्या वाढत्या दबावामुळे आम्हाला रेपो दरात बदल करावा लागेल. त्यानंतर बँकांकडून व्याजदरातही वाढ करण्यात येत आहे. या क्रमाने, आतापर्यंत ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित व्याजदरात वाढ केली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.