राजकारणात खळबळ, बड्या नेत्याची गोळ्या मारून हत्या; परिसरात प्रचंड तणाव

Punjab AAP leader shot dead : पंजाबच्या फिरोजपूरमध्ये आम आदमी पक्षाचे स्थानिक नेते गुरप्रीत सिंह यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या गुरप्रीत सिंह यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Punjab AAP leader shot dead
Punjab AAP leader shot dead साम टीव्ही मराठी
Published On

punjab aap leader shot dead : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक नेते गुरप्रीत सिंह यांची चार अज्ञात हल्खोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोर एका चारचाकी गाडीतून आले होते आणि त्यांनी अचानक गुरप्रीत सिंह यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. (Punjab AAP leader Gurpreet Singh shot dead in Ferozepur)

पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. फिरोजपूर जिल्ह्यात आपचे नेते गुरप्रीत सिंह यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरप्रीत सिंह आपल्या कामात व्यस्त असताना एका कारमधून चार अज्ञात सशस्त्र हल्लेखोर त्या ठिकाणी पोहोचले. काही समजण्याच्या आतच त्यांनी गुरप्रीत सिंह यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गुरप्रीत सिंह रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

Punjab AAP leader shot dead
भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात मोठी खळबळ

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि समर्थकांनी तातडीने गुरप्रीत सिंह यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

Punjab AAP leader shot dead
भाजप नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात मोठी खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. हल्खोरांचा माग काढण्यासाठी आसपासच्या भागातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली की यामागे काही राजकीय कट आहे, या सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com