गाझियाबादमध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रमोद कुशवाह यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रमोद कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता ते दिल्लीतील करावल नगर येथील सासरहून कारने आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी एका सिनेमागृहाजवळ मागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक केले आणि अचानक त्यांच्यावर धाडधाड गोळीबार केला.
हल्लेखोरांनी त्यांच्या कारला लक्ष्य करून अनेक गोळ्या झाडल्याचा आरोप कुशवाहा यांनी केला आहे. यापैकी दोन गोळ्या कारला लागल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे ते घाबरले आणि तेथून निसटून त्यांनी आपला जीव वाचवला. हल्ल्यानंतर दोन्ही तरुणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. जाताना हल्लेखोरांनी आज तर वाचलास पण पुढच्या वेळी तुझं काय खरं नाही अशी धमकी दिल्याचे कुशवाह यांनी सांगितले.
घटनेनंतर प्रमोद कुशवाहा यांनी तातडीने 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती घेतली. परिसरातील नागरिकांचीही चौकशी करण्यात आली. कुशवाहा यांनी आपल्या तक्रारीत आपल्यासह कुटुंबावर पुन्हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. कारमध्ये लागलेल्या गोळ्यांचा तपास करण्यासाठी त्या ताब्यात घेण्यात याव्यात, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.